सिनेस्टाईल थरार! दरोड्यातील आरोपीच्या नातेवाईकांकडून पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 08:08 PM2021-05-11T20:08:38+5:302021-05-11T20:08:55+5:30
आरोपी टेंभुर्णी हद्दीत दरोडा टाकून गेल्या तीन महिन्यापासुन फरार झाला होता.
बाभुळगाव: टेभुर्णी (ता.माढा) सोलापूर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा टाकुन तीन महिन्यापासुन फरार आरोपीला सुगाव (ता.इंदापूर) येथील राहत्या घरातुन अटक केली. त्याला टेंभुर्णी पोलीस ठाण्यात आणत असताना आरोपीच्या नातेवाईकांनी पोलीस गाडीचा पाठलाग करून वाहनाला पाठीमागुन धडक देेेत पोलिसांना मारण्याचा व आरोपीला पळवुन नेण्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.११ ) माळवाडी नं.१ (ता.इंदापूर) येथे घडली आहे. यामध्ये टेंभूर्णी सहाय्यक पोलीस निरीक्षकासह तीन जण जखमी झाले आहे.
.
या प्रकरणी पोलिसांनी वरील सर्व आरोपींवर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. योगेश रावसाहेब चितळे (वय३२) टेंभुर्णी पोलीस स्टेशन यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर दत्तु नारायण सावंत, रोहन दत्तु सावंत, अमोल दत्तु सावंत, उर्मिला दत्तु सावंत, शर्मिला दत्तु सावंत, सुरेखा दत्तु सावंत (सर्व रा. सुगाव, ता.इंदापूर,जि.पुणे) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपी अमोल सावंत याने टेंभुर्णी, सोलापूर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा टाकून तो गेल्या तीन महिन्यापासुन फरार झाला होता. या गुन्ह्यातील आरोपीच्या शोधात टेंभुर्णी पोलीस होते. गुप्त खबर्यामार्फत पोलिसांना खबर मिळाल्यावर टेंभुर्णी पोलिसांनी इंदापूर पोलिसांच्या मदतीने आरोपीला सुगाव येथील त्याच्या राहत्या घरी छापा टाकुन ताब्यात घेतले.
आरोपीला घेवुन टेंभुर्णी पोलीस इंदापूरकडे खासगी वाहनाने येत असताना पाठीमागुन एक्स यु व्ही माॅडेल असणाऱ्या चारचाकी गाडी (एमएच. १२, एएच.२५१५) फिर्यादींच्या गाडीचा पाठलाग करत आली. व माळवाडी नं १ येथे पोलिसांच्या गाडीला पाठीमागुन जोराची धडक दिली व त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच याचवेळी आरोपींनी अमोल सावंतसिनेस्टाइल\ याला पोलिसांच्या ताब्यातुन सिनेस्टाईलने पळवुन नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस गाडीला पाठीमागुन व चार ते पाचवेळा जोराची धडक देवुन पोलीस गाडी दोन्ही बाजुनी चक्काचुर केली.
यावेळी आरोपी अमोल सावंत याने फिर्यादींच्या उजव्या बरगडीत मारून त्यांना जखमी करून पळुन जाण्याचा प्रयत्न केला.आरोपीच्या नातेवाईकांनी सहाय्यक
पोलीस निरीक्षक भोसले यांना धक्काबुक्की केली.या घटनेत सहाय्यक पोलीस निरीक्षकासह तीन पोलीस कर्मचारी कर्मचारी जखमी झाले आहे.पोलिसांनी वरील सर्व आरोपींवर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर टेंभुर्णी पोलिसांनी मुख्य आरोपी अमोल सावंत याला अटक करून माढा न्यायालयात हजर केले असता त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
————————————————————————