Pune : समाजमाध्यमात बदनामीकारक मजकूर प्रसारित; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

By नम्रता फडणीस | Published: November 21, 2024 11:22 AM2024-11-21T11:22:33+5:302024-11-21T11:22:33+5:30

हडपसर विधानसभा मतदारसंघातून जगताप निवडणूक लढवत आहेत. जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) उमेदवार आहेत. 

Circulate defamatory content on social media A case has been registered against one | Pune : समाजमाध्यमात बदनामीकारक मजकूर प्रसारित; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Pune : समाजमाध्यमात बदनामीकारक मजकूर प्रसारित; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : समाजमाध्यमात बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी एकाविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी तक्रार दिली होती.

याप्रकरणी अझहर तांबाेळी आणि साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रशांत सुदामराव जगताप (वय ४७, रा. अनसूया निवास, वानवडी) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघातून जगताप निवडणूक लढवत आहेत. जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) उमेदवार आहेत.

अझहर तांबोळी आणि साथीदारांनी समाजमाध्यमात जगताप यांच्याविरुद्ध बदनामीकारक मजकूर प्रसारित केला. तांबोळी आणि साथीदारांनी दिशाभूल करणारा संदेश प्रसारित केल्याचे जगताप यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक बेंद्रे तपास करत आहेत.

Web Title: Circulate defamatory content on social media A case has been registered against one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.