बारामतीत नागरिक, विद्यार्थ्यांंनी घेतली हरीत शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:09 AM2021-01-10T04:09:42+5:302021-01-10T04:09:42+5:30
शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाव्दारे संपूर्ण राज्यात माझी वसुंधरा अभियानाची सुरुवात २ आॅक्टोबर २०२० पासून करण्यात आली आहे. ...
शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाव्दारे संपूर्ण राज्यात माझी वसुंधरा अभियानाची सुरुवात २ आॅक्टोबर २०२० पासून करण्यात आली आहे. या अभियानामध्ये बारामती नगरपरिषदने देखील सहभाग घेतला आहे. यामध्ये पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या पंचतत्वावर आधारित कामगिरीवर शहराचे मूल्यांकन होणार आहे. पर्यावरण विभागाच्या सूचनेनुसार शहरातील प्रत्येक नागरिकाने या अभियानामध्ये आपला सहभाग नोंदविणे अपेक्षित आहे. या पार्श्वभुमीवर शहरामध्ये विविध ठिकाणी हरित शपथेचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत नगराध्यक्षा तावरे यांचे प्रमुख उपस्थितीत सर्व कर्मचाऱ्यांना हरित शपथ देण्यात आली. तसेच भिगवण रस्त्यालगत नगराध्यक्षा तावरे यांचे हस्ते वृक्षारोपण करून हरित शपथ घेण्यात आली.
यावेळी उपमुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी हनुमंत पाटील, सचिन सातव, बाळासाहेब जाधव, दिपक मलगुंडे, सहायक पोलीस निरिक्षक वाघमारे, विविध बँकाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
नगरपालिकेचे अधिकाऱ्यांनी शहरातील बँका, शाळा, कंपन्या अशा विविध ठिकाणी जाऊन या अभियानाविषयी
जनजागृती केली.तसेच, उपस्थितांना हरित शपथ देण्यात आली. या सर्व ठिकाणी जवळपास ८०० नागरिक व विद्यार्थ्यांनी हरितशपथ घेतली.