चाकण शहरात सुशोभीकरण केल्याने नागरिकांनी पालिकेचे केले कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:12 AM2021-03-31T04:12:12+5:302021-03-31T04:12:12+5:30
वाढत्या औद्योगिक वसाहतीमुळे चाकण शहराचा झपाट्याने विस्तार वाढू लागला आहे, हे होत असताना तेथील पर्यावरणाचे संतुलन राखणे तितकेच गरजेचे ...
वाढत्या औद्योगिक वसाहतीमुळे चाकण शहराचा झपाट्याने विस्तार वाढू लागला आहे, हे होत असताना तेथील पर्यावरणाचे संतुलन राखणे तितकेच गरजेचे आहे. यासाठी चाकण नगरपरिषदेने देखील पर्यावरण संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. प्रभाग क्रमांक सहामधील मनशक्ती केंद्राच्या लगत असलेल्या कुंपणाचे रंगरंगोटी करण्यात आली आहे. ॉॉ सायकल ट्रेक व हिरवेगार लॉन तयार करण्यात आले आहे. यामुळे शहरातील लोकांना काही वेळ विरंगुळा करण्यासाठी हक्काची छोटीशी बाग झाली आहे.
पूर्वी या जागेत परिसरातील लोक रात्री उपरात्री कचरा टाकत होते. यामुळे साठलेल्या कचऱ्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसह स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नगरपरिषदमध्ये रोजच कचरा हटवण्यासाठी नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. परंतु नगरपरिषद व लोक सहभागातून सायकल ट्रेक व बागेचे काम पूर्ण केले व नागरिकांच्या मनावर सकारात्मक परिणाम होईल असे चांगले सुविचार लिहिले तेव्हापासून परिसरात नंदनवन फुलले आहे. याचा परिणाम नियमित कचरा करणाऱ्या व्यक्तींवर झाला आहे. यामुळे सद्यस्थितीत कुणीही येथे कचरा टाकण्यास धजावत नाही.
--
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शहरात माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रभाग सहामध्ये नगरपरिषद आणि लोक सहभागातून वॉल कंपाऊंडला रंगरंगोटी,चांगले सुविचार,सायकल ट्रक आणि चोटीशी बाग तयार करण्यात आली आहे. अजूनही बरीच कामे करण्यात येणार आहेत. - नानासाहेब कामठे,मुख्याधिकारी,चाकण नगरपरिषद.
----
फोटो क्रमांक : ३०चाकण सुशोभिकरण
फोटो ओळी : चाकणला विविध ठिकाणी सुशोभीकरण करण्यात आले आहे.