लसींचा साठा नसल्याने नागरिकांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:08 AM2021-04-29T04:08:13+5:302021-04-29T04:08:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहराच्या विविध भागांंमध्ये महापालिकेने १८४ लसीकरण केंद्र सुरू केली आहेत. परंतु, लसींचा पुरेसा साठा ...

Citizens are annoyed by the lack of stocks of vaccines | लसींचा साठा नसल्याने नागरिकांना मनस्ताप

लसींचा साठा नसल्याने नागरिकांना मनस्ताप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहराच्या विविध भागांंमध्ये महापालिकेने १८४ लसीकरण केंद्र सुरू केली आहेत. परंतु, लसींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने नागरिकांना लस न घेताच जावे लागत आहे. नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. लसीकरणासाठी सूक्ष्म नियोजन करण्याची गरज आहे, अशी मागणी खासदार गिरीष बापट यांनी केली.

कोरोनाची सद्य:स्थिती आणि आगामी काळातील नियोजनाबाबत, महापालिका आयुक्त विक्रम कुमार भाजपच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, गटनेते गणेश बिडकर, सरचिटणीस राजेश पांडे, गणेश घोष, दत्ता खाडे, आदी यावेळी उपस्थित होते.

बापट म्हणाले की, नागरिकांना लसीच्या साठ्याची पूर्वकल्पना देणे आवश्यक आहे. ज्या नागरिकांनी पहिली लस घेतली त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. या नागरिकांना दुसरा डोस सहज मिळावा यासाठी योजना करणे आवश्यक आहे.

राज्य सरकारकडून दुजाभाव

पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार पुणे शहराबाबत दुजाभाव करीत आहे. त्यामुळेच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर इंजेक्शन आणि कोरोना प्रतिबंधकच्या लसींचा शहराला अपुरा पुरवठा होत आहे. ससून रूग्णालयाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी राज्य सरकार कोणतेही काम करीत नाही. असा आरोप भाजपाकडून करण्यात आला.

चेतन तुपे झोपी गेले आहेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे झोपी गेले आहेत. ते घरातून बाहेर पडत नाहीत. शहरात रुग्णांना बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडिसिव्हर उपलब्ध होत नाही. आरोग्याची स्थिती गंभीर आहे. आमच्यावर केवळ वायफळ टीका करण्यापेक्षा त्यांनी घराबाहेर पडून नागरिकांना मदत केेली पाहिजे, अशी टीका जगदीश मुळीक यांनी केली.

-----

----------

Web Title: Citizens are annoyed by the lack of stocks of vaccines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.