आळंदीत बेशिस्त वाहन पार्किंगमुळे नागरिकांना मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:09 AM2021-07-24T04:09:08+5:302021-07-24T04:09:08+5:30
तीर्थक्षेत्र विकास आरखाड्यांतर्गत शहरातील प्रदक्षिणा मार्गाचे रुंदीकरण झाले आहे. मात्र, शहरातील अनेक धर्मशाळा मंगल कार्यालये व दुकानदारांना स्वतःची मुबलक ...
तीर्थक्षेत्र विकास आरखाड्यांतर्गत शहरातील प्रदक्षिणा मार्गाचे रुंदीकरण झाले आहे. मात्र, शहरातील अनेक धर्मशाळा मंगल कार्यालये व दुकानदारांना स्वतःची मुबलक पार्किंगची व्यवस्था नसल्यानेे अनेक गाड्या रस्त्यावरच बेशिस्तरित्या पार्किंग केल्या जात आहेत. तसेच अन्य कामांसाठी शहरात आलेली वाहनचालकांकडून संबंधित गाड्या रस्त्यावरच तासनतास वाहतुकीस अडथळा होईल अशारीतीने लावल्या जात आहेत.
विशेषतः वडगाव रस्ता, प्रदक्षिणा रस्ता, चाकण रस्ता, मरकळ रस्ता आदी ठिकाणी गाड्या रस्त्यावरच लावल्या जात आहे.
औद्योगिक वसाहतींमध्ये जाणाऱ्या अवजड वाहनांवर अंकुश न ठेवल्याने वाहतूक कोंडी अधिक भर घालत आहे. शिस्तीचा अभाव, बेशिस्त पार्किंग, अवजड व रस्त्यावरील अतिक्रमण आदींमुळे आळंदीकरांना कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
--
फोटो क्रमांक : २३ आळंदी ट्राफिक जाम
फोटो ओळ : आळंदी शहरातील प्रदक्षिणा मार्गावर करण्यात आलेली बेशिस्त पार्किंग. (छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)