धुळीमुळे होतोय नागरिकांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:11 AM2021-03-05T04:11:07+5:302021-03-05T04:11:07+5:30

वडगाव खुर्द येथे असणाऱ्या रेडीमिक्स काँक्रीट प्लांटमुळे रस्त्यावरून ये-जा करणारे, देवीआईनगर, प्रयेजा सिटी,मधुकोश सोसायटी आदी परिसरातील हजारो नागरिकांना या ...

Citizens are suffering due to dust | धुळीमुळे होतोय नागरिकांना त्रास

धुळीमुळे होतोय नागरिकांना त्रास

Next

वडगाव खुर्द येथे असणाऱ्या रेडीमिक्स काँक्रीट प्लांटमुळे रस्त्यावरून ये-जा करणारे, देवीआईनगर, प्रयेजा सिटी,मधुकोश सोसायटी आदी परिसरातील हजारो नागरिकांना या धुळीमुळे त्रास होत आहे. काही नागरिक श्वासोच्छ्वास व घशाच्या आजाराने त्रस्त आहेत. परिसरातील नागरिकांच्या अन्न व पाण्यात सिमेंटचे कण मिसळते. विशेषतः देवीआईनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या दोनशे कुटुंबांना सर्वाधिक धुळीच्या कणांचा सामना करावा लागत आहे.

दररोज प्लांटमधून शेकडो अवजड वाहने रस्त्याने जात असून या वाहनांतून व वाहनांतून सांडणाऱ्या सिमेंटमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. अवजड वाहनांमुळे या ठिकाणी लहान- मोठे अपघात सतत घडत असतात. काही नागरिकांना तर कायमचे अपंगत्व आले आहे. याबाबत शिवसेनेच्या वतीने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.

कोट:

रेडीमिक्स काँक्रीट प्लांटमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल.

- भरत कुंभारकर, शिवसेना उपशहर प्रमुख

फोटो ओळ: वडगाव खुर्द परिसरात रेडीमिक्स घेऊन वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट उठतात.

Web Title: Citizens are suffering due to dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.