कर्णकर्कश....आवाजामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 02:12 PM2018-07-03T14:12:22+5:302018-07-03T14:59:53+5:30

फटाक्यांची आताषबाजी करून ही मंडळी थांबत नाहीत, तर काही ठिकाणी डिजे लावलेला असतो, तसेच, त्यांची मित्रमंडळी गल्लीबोळातून आणि मुख्य रस्त्यावरून दुचाकीचा जोरजोरात आवाज करत किंचाळत असतात. 

citizens' health in danger zone due to sound pollutions | कर्णकर्कश....आवाजामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात 

कर्णकर्कश....आवाजामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात 

Next
ठळक मुद्देबालके, ज्येष्ठांना मोठा त्रास : मध्यरात्री वाढदिवस करण्याच्या प्रकारात वाढ... तर विकृत संस्कृतीला आळा बसेल 

हडपसर : अलिकडे रात्री बारा वाजता वाढदिवस साजरा करताना फटाक्यांची आताषबाजी करण्याचे फॅड वाढीस लागले आहे. तसेच दुचाकीच्या सायलन्सरची पुंगळी करून जोरजोरात आवाज काढत वाहने उडविण्याची विकृत संस्कृती रुजू होत असल्याने समाजाचे स्वास्थ्य बिघडत आहे. या त्रासदायक प्रकारामुळे लहान बालके,ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, हृदयरुग्ण यांना ध्वनी प्रदूषणाचा प्रचंड त्रास होत असतो. मोठ्या आवाजामुळे हृदयरोगरुग्णाचा बळीही जाण्याची भीती वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अशा विचित्रप्रकारे वाढदिवस साजरा करणाऱ्यांवर स्थानिक पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
हडपसर आणि परिसरात रात्रीच्या बारा वाजता फटाक्यांची आताषबाजी अनेकवेळा ऐकण्यात येते. त्यामुळे निद्रानाश होतो आणि नंतर बराच वेळ झोपही लागत नाही. त्यामुळे स्वास्थ्यावर मोठा परिणाम होतो. या प्रकाराची सकाळी चौकशी केल्यानंतर जवळच एखाद्या कार्यकर्त्यांचा दणक्यात वाढदिवस साजरा करण्यासाठी फटाके फोडलेले असतात. फटाक्यांची आताषबाजी करून ही मंडळी थांबत नाहीत, तर काही ठिकाणी डिजे लावलेला असतो, तसेच, त्यांची मित्रमंडळी गल्लीबोळातून आणि मुख्य रस्त्यावरून दुचाकीचा जोरजोरात आवाज करत किंचाळत असतात. 
...........................
पोलिसांनीच कारवाई करावी
रात्री-अपरात्री फटाक्यांचा आवाज आणि प्रकाशाच्या दिशेने रात्रीच्या गस्तीवरील पोलिसांनी धाव घेऊन संबंधितावर गुन्हे दाखल करावेत. मात्र, आमची पोलीस यंत्रणा म्हणते आमच्याकडे कोणी तक्रार केली तरच आम्ही त्याच्या तपास करून गुन्हा दाखल करून कारवाई करतो. त्यामुळे पोलिसांनीच अशा प्रकारच्या घटनेची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
.....................
... तर विकृत संस्कृतीला आळा बसेल 
सामाजिक ऐक्याचे भान ठेवून वाढदिवस साजरा केला, तर आनंद द्विगुणित होईल. त्यासाठी गरीब, गरजू मुलांना शालेय साहित्य द्यावे, अनाथ संस्थांमध्ये फळे व कपडे वाटप करावे, केक ही खाण्याचा पदार्थ आहे. तो तोंडाला फासण्याऐवजी तो स्वत:ला खायचा नसेल, तर गरीब किंवा अनाथ संस्थांमध्ये नेऊन तेथील नागरिकांना द्यावा. आरोग्य शिबिर राबवावे, वृक्षारोपण करावे, एखाद्या गरीब व होतकरू मुलाला दत्तक घेऊन त्याच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली, तर समाजामध्ये चांगला संदेश जाईल. तसेच फटाक्याच्या ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळता येईल आणि विकृत संस्कृतीला आळा बसेल, असे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले.

Web Title: citizens' health in danger zone due to sound pollutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.