खेडमधील नागरिक लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:07 AM2021-04-29T04:07:48+5:302021-04-29T04:07:48+5:30

खेड तालुक्यात कोविशिल्डचे लसीकरण करण्यात येत आहे. मार्च महिन्यात कोव्हॅक्सिनचे १ हजार ९५४ नागरिकांना लसीकरण करण्यात आले होते. दुसरा ...

Citizens in Khed waiting for the second dose of the vaccine | खेडमधील नागरिक लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत

खेडमधील नागरिक लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत

googlenewsNext

खेड तालुक्यात कोविशिल्डचे लसीकरण करण्यात येत आहे. मार्च महिन्यात कोव्हॅक्सिनचे १ हजार ९५४ नागरिकांना लसीकरण करण्यात आले होते. दुसरा डोस घेण्यासाठी सदरची लस आठवडाभरात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. उपलब्ध होताच ज्या केंद्रात लसीकरण झाले त्याच ठिकाणी ही लस उपलब्ध होणार असून आरोग्य विभागामार्फत संबंधित नागरिकांना कळविण्यात येणार आहे. तालुक्यात कोव्हॅक्सिन लस ४ हजार ५४२ नागरिकांनी घेतली.

तालुक्यात १६ जानेवारीला लसीकरण सुरु झाले. २६ एप्रिल अखेरपर्यंत ९१९५२ नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे. तालुक्यात ६० वर्षांपुढील ३४ हजार ७९६ ज्येष्ठ नागरिकांचे पहिले तर १८६५ नागरिकांनी दुसरा डोस घेतला. ४५ वयापुढील ३६ हजार ८२ पहिला डोस, तर ७६२ नागरिकांचा दुसरा डोस झाला आहे. आरोग्य क्षेत्रातील ३ हजार ४५ जणांचे पहिले, तर १६१६ जणांनी दुसरा डोस घेतला. फ्रंटलाईन सेवेतील १२ हजार ११४ जणांचा पहिला, तर १६७२ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

Web Title: Citizens in Khed waiting for the second dose of the vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.