वाढत्या लॉकडाऊनमुळे नागरिक चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:09 AM2021-06-04T04:09:57+5:302021-06-04T04:09:57+5:30

-- इंदापूर : इंदापूर शहरासह तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन करण्यात आले. यामध्ये ठराविक यावेळेस नागरिकांना आपल्या दैनंदिन गरजेच्या ...

Citizens nervous about increasing lockdowns | वाढत्या लॉकडाऊनमुळे नागरिक चिंताग्रस्त

वाढत्या लॉकडाऊनमुळे नागरिक चिंताग्रस्त

Next

--

इंदापूर : इंदापूर शहरासह तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन करण्यात आले. यामध्ये ठराविक यावेळेस नागरिकांना आपल्या दैनंदिन गरजेच्या जीवनावश्यक वस्तूंसह इतर व्यवहार करण्यास मुभा देण्यात आली होती. वैद्यकीय सेवा सर्वांना दिवसभर देण्यात आल्या आहेत. मात्र, लॉकडाऊन संपत नाही तोच आणखी १५ जूनपर्यंत लॉकडाऊनचे आदेश आले असून, आता सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सूट देण्यात आली. मात्र, सततच्या लॉकडाऊनमुळे समाजातील सर्वच घटकांतील लघू व्यावसायिक, व्यापारी वर्ग आणि शेतकरी वर्ग, यांच्यामध्ये चिंता व्यक्त होत आहे.

इंदापूर शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात, बेरोजगार युवकांनी राष्ट्रीय बँकांकडून लाखाचे कर्ज घेऊन आपले उद्योग, व्यवसाय सुरू केले. यामध्ये भाडेतत्त्वावर महागड्या व्यापारी संकुलातील दुकाने घेऊन, त्यामध्ये लाखो रुपयांचा माल खरेदी करून विक्रीसाठी उपलब्ध करून ठेवला आहे. मात्र, वाढत्या लॉकडाऊनमुळे मालाची विक्री मोठ्या प्रमाणात थांबल्यामुळे, व्यापार करणाऱ्यांना घटकांना बँकेच्या दर महिन्याच्या कर्जाची परतफेड करण्याची असमर्थता व्यक्त होत आहे. ज्या खासगी दुकानांना भाडेतत्त्वावर घेतले आहेत. त्याचे भाडेसुद्धा भरण्यास अकार्यक्षम ठरत असून, राष्ट्रीय बँकांची दर महिन्याचे हप्ते भरावे लागतात. यासाठी पैसा आणायचा कुठून, हा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊनमुळे कापड व्यापार यासह इतर उद्योग करणाऱ्यांमध्ये दररोज होत असलेला व्यवहार थांबल्यामुळे सर्व घटकांतील व्यापारी आर्थिक संकटात पुरते सापडले आहेत.

इंदापूर शहरातील तर वेगवेगळ्या उद्योगांवर संक्रांत आली आहे. एवढेच नाही तर जीवनावश्यक दैनंदिन गरजेच्या वस्तू विकणाऱ्या किराणा व्यावसायिक यांनासुद्धा जेमतेम कमी वेळ देण्यात आल्यामुळे, त्यांचा माल सुद्धा कमी स्वरूपात विक्री होत असल्याने त्यांच्यामध्ये चिंता व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांकडे मागील कर्ज थकीत असल्यामुळे, शेतकऱ्यांसाठी पुनर्गठन आणि इतर कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी शिबिरे घेण्याची गरज असून, शेतकऱ्यांना राष्ट्रीय बँकांकडून आणि खासगी बॅंकांकडून लवकरात लवकर कर्ज मागणी होत आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी बियाणे उपलब्ध व्हावे, याकरिता कृषी सेवा केंद्र खुले ठेवण्यात येत असून, शेतकऱ्यांना हमी युक्त बियाणे मिळावे, यासाठी प्रशासनाकडून तालुका कृषी अधिकारी, तसेच इतर प्रशासनाकडून यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.

--

चौकट :

शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध करणे गरजेचे

सद्य:स्थितीत माॅन्सून वारे धडकले असून, शेतकऱ्यांमध्ये पेरणीची आणि शेतीच्या मशागतीची तयारी मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, दर वर्षी मिळणाऱ्या राष्ट्रीय बँकांकडून पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची पायपीट होत असून, अर्धे अधिक शेतकरी अवैध सावकारीच्या सवाई दीडच्या विळख्यात अडकण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शक्यतोवर वेळेच्या आत पीक कर्ज उपलब्ध करून दिल्यास अवैध सावकारीच्या विळख्यातून त्याची मुक्तता होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

___

चौकट :

इंदापूर शहरातील जुन्या व्यापाऱ्यांना नाहक त्रास कशासाठी ?

इंदापूर शहरातील व्यापाऱ्यांना थोडे समजून घ्या. असा सल्ला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रशासनाला दिला असताना देखील, कारवाईचा बडगा पुढे येत आहे. इंदापूर शहरात तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे, तालुक्यातील १४० गावांतून नागरिक काही वस्तू खरेदी करण्यासाठी येत असतात. खरेदीसाठी अपुरा वेळ असल्यामुळे व दुकानांमध्ये गर्दी करायची नाही, असा दंडक असल्यामुळे थोडाफार अवधी पाच दहा मिनिटांचा दुकान बंद करण्यासाठी लागला, तर शासकीय दंडक दाखवून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. मात्र, तालुक्यातील नागरिकांना व शेतकऱ्यांना कायम वरदान ठरणाऱ्या या व्यापाऱ्यांना नाहक त्रास नको, असे सुज्ञ नागरिकांतून बोलले जात आहे.

Web Title: Citizens nervous about increasing lockdowns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.