वाकी बुद्रुकमध्ये लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:10 AM2021-04-14T04:10:19+5:302021-04-14T04:10:19+5:30
वय वर्षे ४५ व त्यापुढील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे. वाकी बुद्रुक ग्रामपंचायतच्या वतीने लसीकरण ठेवण्यात ...
वय वर्षे ४५ व त्यापुढील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे.
वाकी बुद्रुक ग्रामपंचायतच्या वतीने लसीकरण ठेवण्यात आले होते.
या लसीकरणात अनेक नागरिकांनी सहभाग दाखवला.
सकाळी दहा वाजता सरपंच वैशाली जरे सर्व सदस्य व आरोग्य अधिकारी डॉक्टर पूनम चिखलीकर यांच्या उपस्थितीत लसीकरण सुरू करण्यात आले.
लसीकरणासाठी सरपंच वैशाली जरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पूनम चिखलीकर, डॉ. रजनी कातोरे, ग्रामसेवक विजय भंडारे, तलाठी व्ही. व्ही. मुंगारे, माजी सरपंच, विद्यमान सदस्य विनोद टोपे, माजी उपसरपंच विकास जाधव, सदस्य स्वाती टोपे, सुनीता कड, राजश्री टोपे, संतोष गारगोटे, कावेरी टोपे,सदानंद मोहिते,अर्चना मांजरे,अतिश काळबांडे,सोनाली सावंत, प्राथमिक व माध्यमिक शाळांचे शिक्षक, आशा वर्कर यांनी या लसीकरणाचे सुनियोजन केले होते.
वाकी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत लसीकरण करण्यात आले.