नागरिकांना स्वखर्चाने आधारकार्ड

By admin | Published: December 22, 2016 11:57 PM2016-12-22T23:57:50+5:302016-12-22T23:57:50+5:30

आधारकार्डची प्रत्येक नागरिकाला गरज आणि प्रत्येक ठिकाणी गरजेचे असल्याचे ओळखत व शासनाने आधारकार्ड सक्तीचे केल्याने

Citizens self-funding Aadhaar card | नागरिकांना स्वखर्चाने आधारकार्ड

नागरिकांना स्वखर्चाने आधारकार्ड

Next

आव्हाळवाडी : आधारकार्डची प्रत्येक नागरिकाला गरज आणि प्रत्येक ठिकाणी गरजेचे असल्याचे ओळखत व शासनाने आधारकार्ड सक्तीचे केल्याने ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना आधारकार्डपासून वंचित असल्याचे पाहून ग्रामपंचायत सदस्य व नॅशनल चॅम्पियन ज्ञानेश्वर कटके यांनी आजपर्यंत २००० नागरिकांना स्वखर्चाने आधारकार्ड काढून दिले आहे.
शासनाने आधारकार्ड सक्तीचे केल्याने ग्रामीण भागातील जनतेला आधार कार्डपासून वंचित राहावे लागत आहे. शासकीय कोणत्याही ठिकाणी गेल्यावर आधारकार्ड विचारत आहेत. यामुळे आधारकार्ड गरजेचे आहे. काही ठिकाणी आधारकार्ड काढण्यासाठी पैसे द्यावे लागत आहे. वाघोली, केसनंद, आव्हाळवाडी, मांजरी खुर्द या परिसरातील २००० नागरिकांची आधारकार्ड काढण्यात आली आहेत. या भागातील जनतेला आधारकार्डपासून दूर राहू नये यासाठी सतत प्रयत्न करीत राहणार असल्याचे लोकमतला सांगितले. ५००-१००० रुपये नोटाबंदीमुळे नागरिकांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. त्यात बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी गरज लागत आहे.

Web Title: Citizens self-funding Aadhaar card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.