नागरिकांनी आचार संहितेचे पालन करा : मिलींद मोहिते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:09 AM2020-12-27T04:09:20+5:302020-12-27T04:09:20+5:30
१ जानेवारी व त्यानंतर लगेचच कोरेगाव भीमा परिसरात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकींच्या पार्श्वभूमिवर कोरेगाव भीमा, सणसवाडी सह वढू बुद्रक ...
१ जानेवारी व त्यानंतर लगेचच कोरेगाव भीमा परिसरात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकींच्या पार्श्वभूमिवर कोरेगाव भीमा, सणसवाडी सह वढू बुद्रक येथे पोलीस प्रशासनाच्या वतीने ग्रामस्थांच्या बैठका आयोजीत करण्यात आल्या होत्या. यावेळी पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते , उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस , शिक्रापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक उमेश तावसकर , सहाय्यक पोलीस निरिक्षक मयुर वैरागकर , सहाय्य्क पोलीस उपनिरिक्षक अविनाश थोरात कोरेगाव भिमातील प्रशासक जे.एल. काळे , ग्रामविकास अधिकारी गुलाब नवले, बाळासाहेब पवणे , केंज , पोलीस पाटील जयसिंग भंडारे मालन गव्हाणे, व ग्रामस्थ नागरीक उपस्थित होते.
यावेळी बोलताना मिलींद मोहिते यांनी सांगितले की ,'''' गावामध्ये निवडणुकीचे वातावरण असून कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा ग्रामीण पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. निवडणूक म्हटली की वाद विवाद आलेच पण ते न होता गावातील वातावरण शांत कसे राहील यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्न करित असल्याचे त्यांनी सांगितले.
--
चौकट :
शंभर जणांची यांदी तयार
१ जानेवारी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमिवर काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींसह गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सुमारे शंभर जणांची यादी तयार करण्यात आली आहे. या सर्वांना २ जानेवारी २०२१ पर्यंत हद्दपार करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल. अन्य कुठल्याही जिल्ह्यातील कुणीही व्यक्ती १जानेवारी रोजी पुणे जिल्हा पोलिसांच्या परवानगी शिवाय तसेच प्रवेश पास घेतल्याशिवाय कोरेगाव भीमा तसेच पेरणे परिसरात प्रवेश करू शकणार नाही असे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी सांगितले.