नागरिकांनी खबरदारी घ्यावी हाच उपाय :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:12 AM2021-04-04T04:12:05+5:302021-04-04T04:12:05+5:30

-- कोरेगाव भीमा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमात गेले दोन दिवस अँटिजन टेस्ट करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात ग्रामपंचायतीला यश ...

Citizens should take precautions: | नागरिकांनी खबरदारी घ्यावी हाच उपाय :

नागरिकांनी खबरदारी घ्यावी हाच उपाय :

Next

--

कोरेगाव भीमा :

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमात गेले दोन दिवस अँटिजन टेस्ट करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात ग्रामपंचायतीला यश आले असून गावात औषध फवारणी व संचारबंदीचे काटेकोर पालन व आठवडे बाजर बंद केल्याने मोठ्या लोकसंख्येच्या गावातही कोरोनाला अटकाव घालता येऊ शकत असल्याचे सरपंच अमोल गव्हाणे यांनी सांगितले.

प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी शिरुर तालुक्यातील १४ हॉटस्पॉट गावांमध्ये अँटिजेन टेस्ट तपासण्या वाढवण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यानुसार तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी प्रज्ञा घोरपडे व जालिंदर मारणे यांनी हॉटस्पॉटमधील प्रत्येक गावात जावून आरोग्य कर्मचारी व आशासेविकांच्या सहकार्याने भाजी मंडई, तसेच दुकानदारांच्या अँटिजेन तपासण्या केल्या. यात या गावांमध्ये कोरोना संक्रमित रुग्ण मिळून आले. यावेळी कोरेगाव भीमा येथे आरोग्य केंद्राचे जालिंदर मारणे यांच्यासह सरपंच अमोल गव्हाणे, माजी सरपंच विजय गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य केशव फडतरे, महेश ढेरंगे, भाजपचे संपत गव्हाणे, ग्रामविकास अधिकारी गुलाबराव नवले, राजेंद्र गवदे, विनायक गव्हाणे, भाऊसाहेब लोहार, आरोग्य कर्मचारी संतोष थिटे, आशासेविका अमृता गव्हाणे, सुनीता पाटील, सोनाली राऊत, मंगल खरात आदी उपस्थित होते. तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोगय केंद्रातील १० गावांमध्ये १०३ नवे कोरोना संक्रमित रुग्ण आज एकाच दिवसात सापडले असल्याने परिसरात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.

-- चौकट

--

४०० जणांची केली अँटिजेन टेस्ट

--

तळेगाव ढमेढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने कोरेगाव भीमा येथे १४० अँटिजेन टेस्टमध्ये ४ कोरोना संक्रमित रुग्ण आढळले , तळेगाव ढमढेरे येथे १६२ टेस्टमध्ये ६४ कोरोना संक्रमित रुग्ण, सणसवाडी येथे ९८ टेस्टमध्ये ३१ कोरोना रुग्ण शोधण्यात यश आले असून यापुढील काळातही अँटिजेन टेस्ट सुरू राहणार असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी प्रज्ञा घोरपडे यांनी सांगितले.

चौकट : गाव कोरोनामुक्त करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.

कोरेगाव भीमा येथे गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाला अटकाव घालण्यात ग्रामपंचायत प्रशासनाला यश आले आहे. मात्र ग्रामस्थांनी कोरोनाला सोप्यात न घेण्याचे आवाहन सरपंच अमोल गव्हाणे यांनी करताना गावात औषध फवारणी , अँटिजेन टेस्ट करण्यात येत असून नागरिकांनीही गाव कोरोना मुक्त करण्यासाठी ग्रामपंचायतीला सहकार्य करावे असे सांगितले.

---

फोटो ०३

फोटो : कोरेगाव भीमा (ता.शिरुर) येथे नागरिकांची अँटिजेन तपासणी करताना वैद्यकीय अधिकारी समवेत सरपंच अमोल गव्हाणे व इतर पदाधिकारी.

Web Title: Citizens should take precautions:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.