कर्वेनगरमध्ये संथगती खोदाईमुळे नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:11 AM2021-05-27T04:11:10+5:302021-05-27T04:11:10+5:30
गिरिजा शंकर सोसायटीपासून नटराज सोसायटी पुढेही हे खोदकाम चालू आहे. हे नऊ ते दहा फूट खोल खोदकाम असून या ...
गिरिजा शंकर सोसायटीपासून नटराज सोसायटी पुढेही हे खोदकाम चालू आहे. हे नऊ ते दहा फूट खोल खोदकाम असून या खोदकामाजवळ सुरक्षारक्षक किंवा कोणत्याही प्रकारचे सूचनाफलक नाही. त्याबरोबरच रस्ता बंद करण्यासाठी बॅरिकेडस लावण्यात आले नाही. परिसरात रात्रीचा प्रवास करणाऱ्या नागरिकांना यामुळे धोका निर्माण झाला आहे. पालिकेच्या या बेजबाबदार कारभाराबद्दल परिसरात संताप व्यक्त होत आहे. या कामाकडे लोकप्रतिनिधीदेखील दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. असे धोकादायक पद्धतीचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी परिसरातून होत आहे.
प्रतिक्रिया
हे खोदकाम करताना कंत्राटदाराने या ठिकाणी सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेतली नाही. हा रस्ता या परिसरातील मुख्य रस्ता आहे. होणाऱ्या अपघातास जबाबदार कोण असा प्रश्न आहे. - सुशांत भिसे, अध्यक्ष सामर्थ्य प्रबोधिनी
या पाणीपुरवठा वाहिनीचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. या कामामुळे परिसरात पाण्याचा प्रश्न कायमच मिटणार आहे. सुरक्षारक्षक आणि सूचनाफलक लावण्यात येतील. सुरक्षिततेबाबत कोणतीही हयगय केली जाणार नाही. - दीपक पोटे
स्थानिक नगरसेवक