नसरापूरमध्ये वाहतूककोंडीने नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:07 AM2020-12-28T04:07:28+5:302020-12-28T04:07:28+5:30
नसरापूर गावातील एस टी स्थानक, पीडीसीसी बँक परिसर, कामथडी फाटा, खरेदी विक्री संघ परिसर, लेंडी पुल, बनेश्वर चौक ...
नसरापूर गावातील एस टी स्थानक, पीडीसीसी बँक परिसर, कामथडी फाटा, खरेदी विक्री संघ परिसर, लेंडी पुल, बनेश्वर चौक येथे तर वाहने रस्त्याच्या दुतर्फा थांबल्याने वाहतुकीची हमखास कोंडी होते. बाजारपेठेतील अरुंद रस्ते त्यातच काही व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. याशिवाय बेशिस्त पार्किंग यामुळे वाहतूककोंडी होत असतेच त्यातच छोटे व्यापाऱ्यानी रस्त्याकडेला बसत असल्याने कोंडीत आणखी भर पडत आहे. या बाजार पेठेतूनच वेल्हा आणि बनेश्वर येथे जाण्याचा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमीच गर्दी पहायला मिळते.
वाहतूककोंडी समस्या सोडवण्यासाठी वारंवार ग्रामपंचात आणि पोलीस प्रशासनला सांगूनही ते याकडे दुर्लक्ष करत आहे. बाजारपेठेत पोलीस कर्मचारी असतानादेखील बेशिस्त पार्किंगला शिस्त लावण्यात पुढाकार घेत नाही. ग्रामपंचायत प्रशासनाबाबत तर बोलायचे काम नाही. काही वेळा तर या वाहतूककोंडीत रुग्णवाहिका अडकल्याचेही निदर्शनास आले आहे. ग्रामपंचायत आणि पोलिस प्रशासन कोणावर एवढे मेहरबान होत आहे की, वाहतूककोंडीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे.
सध्या यात्रांचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक येथील बाजापेठेत येत आहे. तसेच सुट्ट्यांमुळे बनेश्वर येथे जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करत असल्याने मोठी वाहतूककोंडी होत आहे.त्यामुळे प्रशाासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी जोर धरु लागली आहे.
नसरापूर ( ता. भोर ) येथे झालेली वाहतुक कोंडी.
२७ नसरापूर