जनजागृतीनंतर ठाकरवाड्यातील नागारिकांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:10 AM2021-04-06T04:10:00+5:302021-04-06T04:10:00+5:30
सरपंच चंद्रकांत बारणे, उपसरपंच सिद्धार्थ कोहिणकर, ग्रामसेवक नीलेश पांडे, आरोग्य सहाय्यक प्रशांत फुगे यांच्या लक्षात आली. या पदाधिकारी व ...
सरपंच चंद्रकांत बारणे, उपसरपंच सिद्धार्थ कोहिणकर, ग्रामसेवक नीलेश पांडे, आरोग्य सहाय्यक प्रशांत फुगे यांच्या लक्षात आली. या पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी वस्तीनिहाय ठाकरवाड्यांमधील ग्रामस्थांना प्रत्यक्ष भेटून आरोग्यासाठी,स्वरक्षणासाठी, कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी जनजागृती केली.लसीकरणाविषयी त्यांच्या मनातील गैरसमज व भीती दूर करण्यासाठी प्रयत्न केले. कोरोनासाथीत झालेल्या जीवितहानीची आणि शासनाच्या प्रयत्नाची माहिती पटल्याने आदिवासी वस्त्यांमधील ४५ वर्षे वयाच्या वर्षापुढील २३० पैकी ६३ ग्रामस्थांनी शनिवारी व रविवारी उत्स्फूर्तपणे आरोग्य केंद्रात येऊन लसीकरण करून घेतले.
योग्य पद्धतीने मार्गदर्शन व जनजागृतीमुळे आदिवासी वाड्या-वस्त्यांमधील राहिलेल्या ग्रामस्थांचेही १००% लसीकरण करून घेऊ असे सरपंच चंद्रकांत बारणे यांनी सांगितले.
ग्रामस्थांच्या जनजागृतीसाठी डॉ. आरती मुळे, डॉ मानसी गांगुर्डे, डॉ. भाग्यश्री पाटील, आर. एस. कुलकर्णी, शंकर थोरात, ओंकार कोहिणकर, प्रतिभा कारले, ज्योती जाखडे, हिरा बनकर, मदिना शेख आणि प्राथमिक शिक्षक आदींनी सामूहिक प्रयत्न केले.
--
०५कडूस लसीकरण :
सोबत : दोन्दे गावातील आरोग्य उपकेंद्रात ठाकरवाडीच्या ग्रामस्थांनी गैरसमज दूर झाल्यानंतर स्वयंप्रेरणेने लस घेतली.