वालचंदनगरमधील नागरिक सापांमुळे झालेत भयभीत; उद्योगनगरीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 12:37 PM2017-11-25T12:37:41+5:302017-11-25T12:49:10+5:30

गवताचे वाढलेले प्रमाण, अस्वच्छता व प्रत्येक वसाहतीत आलेले जंगलाचे स्वरूप यामुळे उंदरांनी घातलेला धुमाकूळ, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या उपद्रवामुळे वालचंदनगर येथील नागरिक भयभीत झालेले आहेत.

Citizens of Walchand nagar are scared; Ignore the industrial city by company | वालचंदनगरमधील नागरिक सापांमुळे झालेत भयभीत; उद्योगनगरीकडे दुर्लक्ष

वालचंदनगरमधील नागरिक सापांमुळे झालेत भयभीत; उद्योगनगरीकडे दुर्लक्ष

Next
ठळक मुद्देवाढलेल्या गवतामुळे उंदरांचा सुळसुळाट, विषारी सापांची संख्याही वाढलीशहरातील कॉलनीकडे कंपनी व्यवस्थापक मंडळाचे दुर्लक्ष

वालचंदनगर : वालचंदनगर शहरातील गवताचे वाढलेले प्रमाण, अस्वच्छता व प्रत्येक वसाहतीत आलेले जंगलाचे स्वरूप यामुळे उंदरांनी घातलेला धुमाकूळ, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या उपद्रवामुळे येथील नागरिक भयभीत झालेले आहेत. घोणस, नाग, मन्यार अशा विषारी सापाचे वाढलेले प्रमाणामुळे वालचंदनगर शहर नावाऐवजी सर्पनगरी नावाने ओळखले जावे, असे लेखी निवेदन कंपनीच्या व्यवस्थापकीय अधिकारी जे. के. पिल्लाई यांना देण्यात आलेले आहे. 
वालचंदनगर शहराची स्थापना शंभर वर्षापूर्वी वालचंद हिराचंद दोशी यांनी नियोजनबद्ध पद्धतीने केली. कामगारांच्या हितासाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देणारा देशातील पहिले शहर म्हणून वालचंदनगर शहराची ओळख आहे. या शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा, दवाखाने सर्वच काळजी घेण्यात आलेले होते. परंतु कंपनीच्या व्यवस्थापक मंडळाच्या दुर्लक्षामुळे वालचंदनगर शहरात जंगलाचे स्वरूप आलेले आहे. प्रत्येक कॉलनीत वाढलेल्या गवतामुळे उंदरांचा सुळसुळाट झालेला आहे. त्यामुळे विषारी सापांची संख्याही वाढताना दिसून येत आहे. परिसरात विषारी सर्प आढळून येत आहेत. या शहरातील कॉलनीकडे व्यवस्थापक मंडळाचे दुर्लक्ष झाल्याने अनेक खोल्यांची पडझड झालेली आहे. यामुळे हिंस्र प्राण्यांच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. 
वालचंदनगर शहराचे वैभव या व्यवस्थापकीय मंडळीने नामशेष करण्याचा सपाटा लावल्याने वालचंदनगर नावाने ओळखण्याऐवजी सर्पनगरी या नावाने ओळखण्याची वेळ आलेले आहे. त्वरित या शहरातील प्रत्येक कॉलनीतील गवताचे वाढलेले प्रमाण काढण्यात यावे व येथे स्वच्छता करण्यात यावी अन्यथा कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष महादेव मिसाळ यांनी दिला आहे.

Web Title: Citizens of Walchand nagar are scared; Ignore the industrial city by company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे