संचारबंदीतही नागरिक फिरतात बिनधास्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:16 AM2021-02-28T04:16:45+5:302021-02-28T04:16:45+5:30
शहरातील सिंहगड रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, केळकर रस्ता, शिवाजी रस्ता, सातारा रस्ता या प्रमुख रस्त्यांबरोबरच ...
शहरातील सिंहगड रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, केळकर रस्ता, शिवाजी रस्ता, सातारा रस्ता या प्रमुख रस्त्यांबरोबरच दहा चौकांची पाहणी केली.
या प्रमुख रस्त्यांवर रात्री ११.३० नंतर एकही पोलीस असल्याचे निदर्शनास आले नाही. तसेच सर्व नागरिक बिनधास्त दुचाकीवर फिरताना दिसून येत होते. काही जण विनामास्कही फिरत होते. नागरिकांकडून रात्रीचे नियमही पाळले जात नव्हते. रस्त्यावरून चारचाकी वाहनांचे प्रमाण जास्त होते.
शहरात सर्व दुकाने, हॉटेल ११ नंतर बंद करण्यात आले होते. मात्र रात्री १२ नंतरही नदीपात्रातील खाद्यचौपाटी चालू होती. प्रमुख रस्त्यावर पोलीस नसल्याने नागरिक वेगाने गाड्या चालवत होते. त्यामध्ये एका गाडीवर तिघे जण, कुठलीही भीती न बाळगता नो एन्ट्रीमध्ये घुसखोरी करत असल्याचे चित्र दिसून आले.
रात्री ११.३० नंतर नळस्टॉप चौक, खंडूजी बाबा चौक (डेक्कन कॉर्नर), शिवाजीनगर चौक, संचेती चौक, बालगंधर्व चौक, टिळक चौक (अलका टॉकिज) अप्पा बळवंत चौक, बुधवार चौक (दगडूशेठ मंदिराशेजारी), स्वारगेट चौक, कात्रज चौक, जेधे चौक अशा चौकात पाहणी करण्यात आली. त्यापैकी एकाही चौकात पोलीस दिसून आले नाहीत. काही चौकात तर पोलीस चौकी असूनही हेच चित्र होते. तसेच रिक्षावाले, दुचाकी, चारचाकी वाहने थांबल्याचे निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी तुरळक गर्दीही झाली होती.
१) नळ स्टॉप
- एकही पोलीस नाही
- तुरळक गर्दी होती
- ट्रॅव्हल, कार, दुचाकी, रिक्षा, अशी वाहने फिरत होती.
२) खंडूजी बाबा चौक, डेक्कन कॉर्नर
- एकही पोलीस नाही
- तुरळक गर्दीबरोबरच वेगाने धावणारी वाहने.
- सर्वाधिक चारचाकी वाहने फिरताना दिसून येत होते. तर दुचाकी, ट्रॅव्हल वाहनही सिग्नल न पाळता चालवत होते.
३)शिवाजीनगर चौक
- या चौकात पोलीस चौकी असूनही एकही पोलीस चौकीच्या बाहेर दिसला नाही.
- रिक्षास्टँडवर अनेक रिक्षावाले उभे होते. येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना विचारतही होते.
- सर्वच मोठ्या वाहनांबरोबर चारचाकी, दुचाकी, ट्रॅव्हल, रिक्षा दिसून येत होत्या.
४) संचेती चौक
- एकही पोलीस नाही
- तुरळक गर्दी
रिक्षा, ट्रक, बस, अनेक गाड्या धावताना दिसून आल्या.
५) बालगंधर्व चौक
- पोलीस चौकी असूनही पोलीस नाही.
- तुरळक गर्दी
- रिक्षा, ट्रॅव्हल, दुचाकी अशी वाहने दिसून आली.
६) अलका टॉकीज चौक, टिळक चौक
- पोलीस चौकी असूनही पोलीस नाही,
- सर्व प्रकारची वाहने होती. तसेच नागरिकही फिरताना दिसून आले.
७) अप्पा बळवंत चौक
- पेट्रोलिंग पोलीस दिसून आले.
- सर्व वाहने फिरत होती.
८) दगडूशेठ चौक, बुधवार चौक
- मध्यवर्ती भाग असल्याने तुरळक गर्दी होती.
- दुचाकी, चारचाकी वाहने दिसून आली.
- पेट्रोलिंगचे पोलीस असतात. अशी माहिती पोलिसांनी दिली.
९) स्वारगेट चौक
- पुण्यात ये -जा करणारे प्रवासी या चौकात उतरतात. त्यामुळे तुरळक गर्दी असल्याचे चित्र दिसून आले.
- सर्व प्रकारची वाहने होती.
- विनामास्क फिरणारे नागरिकही दिसून आले.
१०) कात्रज चौक - धायरी चौक
- अनेक लोक सहज बसली होती.
- गाड्या खूप वेगाने धावत होत्या.
रिक्षावाले होते.
एकही पोलीस नाही.
.......
नेहमीच्या संचारबंदीप्रमाणेच रात्रीच्या संचारबंदीत नियम बंधनकारक आहेत. रात्री ११ ते १, १ ते ३, आणि ३ ते ५ या अशा वेळा विभागून पेट्रोलिंग चालू असते. रात्री फिरताना कोणी आढळल्यास कारवाई केली जाते.
- प्रियांका नारनवरे, पोलीस उपायुक्त
.............
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातात. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. रात्रीच्या संचारबंदीतही नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जात आहे.
रवींद्र शिसवे, पुणे पोलीस सहआयुक्त