मुद्रांक व नोंदणी फी यांचा परतावा नागरिकांना मिळणार आता ऑनलाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 03:29 AM2019-12-25T03:29:01+5:302019-12-25T03:29:18+5:30

सोयीसाठी व पारदर्शक कारभारासाठी घेतला निर्णय

 Citizens will receive refunds of stamps and registration fees online now | मुद्रांक व नोंदणी फी यांचा परतावा नागरिकांना मिळणार आता ऑनलाईन

मुद्रांक व नोंदणी फी यांचा परतावा नागरिकांना मिळणार आता ऑनलाईन

Next

पुणे : मुद्रांक व नोंदणी फी परतावा मिळण्यासाठी नागरिकांना नोंदणी व मुद्रांक विभागाकडे सातत्याने हेलपाटे मारावे लागते. यामुळे ३० डिसेंबरपासून संपूर्ण राज्यात मुद्रांक व नोंदणी फी परतावा नागरिकांना आॅनलाइन पद्धतीने मिळणार असल्याची माहिती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे यांनी दिली.

नोंदणी व मुद्रांक विभागाने मुद्रांक व नोंदणी फी परतावा प्रकरणांच्या नोंदीसाठी तयार करण्यात आलेल्या आॅनलाईन परतावा प्रणालीचा वापर केला जाणार आहे. सदर प्रणाली अर्जदारांकरिता विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्जदारांनी न्यायीकेत्तर मुद्रांकाचा किंवा दस्त नोंदणीसाठी शासनास भरलेल्या तथापि दस्त नोंदणी न केलेल्या नोंदणी फी चा परतावा मागणीसाठी अर्ज करण्यापूर्वी या प्रणालीमध्ये डाटा एन्ट्री करणे आवश्यक आहे. ही डाटा एन्ट्री करणे म्हणजे परताव्यासाठी अर्ज करणे असा अर्थ नसून डाटा एन्ट्री केल्यानंतर, संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित मुद्रांकासह अर्जावर रिफंड कोड नमूद करून
विहित मुदतीत अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. या प्रणालीच्या वापरासंदर्भात आवश्यक असलेले प्रशिक्षण संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे.

घरबसल्या समजेल माहिती
आॅनलाईन परतावा प्रणालीमुळे परतावा प्रकरणांवर कार्यवाहीसाठी लागणारा कालावधी कमी होणार असल्याचे कवडे यांनी सांगितले. पक्षकाराला परतावा प्रकरण कोणत्या टप्प्यावर आहे किंवा कोणत्या कारणामुळे प्रलंबित आहे. हे पोर्टलवर घरबसल्या समजणार आहे. त्या संदर्भातील एसएमएस येईल तसेच परतावा आदेश व इतर पत्रव्यवहार डाउनलोड करता येईल.

 

Web Title:  Citizens will receive refunds of stamps and registration fees online now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे