बारामती शहरात आता दिवसाआड मिळणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:08 AM2021-07-11T04:08:53+5:302021-07-11T04:08:53+5:30

सोमवार (दि. १२)पासून शहरातील विवेकानंदनगर, अवधूतनगर, वसंतनगर, व्हिलकॉलनी, ख्रिश्चन कॉलनी, सद्गुरूनगर, पतंगशानगर, महादेवळा, अवचट इस्टेट, क्षत्रियनगर, श्रवणगल्ली, कोष्टीगल्ली, मारवाडपेठ, ...

The city of Baramati will now get water during the day | बारामती शहरात आता दिवसाआड मिळणार पाणी

बारामती शहरात आता दिवसाआड मिळणार पाणी

googlenewsNext

सोमवार (दि. १२)पासून शहरातील विवेकानंदनगर, अवधूतनगर, वसंतनगर, व्हिलकॉलनी, ख्रिश्चन कॉलनी, सद्गुरूनगर, पतंगशानगर, महादेवळा, अवचट इस्टेट, क्षत्रियनगर, श्रवणगल्ली, कोष्टीगल्ली, मारवाडपेठ, गोकुळवाडी, मेडद रोड तसेच संपूर्ण कसबा, लक्ष्मीनारायण नगर, खंडोबानगर, सिकंदरनगर, मोरगाव रोड या विभागास पाणीपुरवठा होईल. तर मंगळवार(दि. १३)पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा बंद राहील, तर (दि. १३) पासून सिनेमा रोड, कचेरी रोड, पानगल्ली, सटवाजीनगर, मुजावर बाडा, म्हाडा कॉलनी, गुनवडी रोड समर्थनगर, देवळे इस्टेट, नेवसे रोड, इंदापूर रोड, मार्केट यार्ड रोड, संपूर्ण आमराई, हबीरबोळ, हरिकृपानगर, सिद्धेश्व रगल्ली, महावीर पथ, शंकरभोई तालीम परिसर, बुरुड गल्ली, भिगवण रोड, विद्यानगर, साईगणेशनगर, मयुरेश्वर अपार्टमेट रोड, आनंदनगर, अशोकनगर, अकल्पित हौ. सो. विजयनगर, पोस्ट ऑफिस रोड, तावरे बंगला परिसर, विश्राम सोसायटी, जवाहरनगर या भागात पाणीपुरवठा होईल. बुधवार, (दि. १४) पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा बंद राहील.

नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे. तसेच तोट्या नसलेले नळ कनेक्शनला तोट्या बसवाव्यात. फिल्टर पाण्याचा अपव्यय टाळावा. तर उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन बारामती नगरपरिषद यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title: The city of Baramati will now get water during the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.