भाजपात शहराध्यक्ष बदलाच्या हालचाली

By admin | Published: September 24, 2015 03:02 AM2015-09-24T03:02:39+5:302015-09-24T03:02:39+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१७मधील सार्वत्रिक निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून शहरपातळीवरील भारतीय जनता पक्षातील कार्यकारिणीत बदल करण्यात येणार असून

The City of BJP Changes in the Movement | भाजपात शहराध्यक्ष बदलाच्या हालचाली

भाजपात शहराध्यक्ष बदलाच्या हालचाली

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१७मधील सार्वत्रिक निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून शहरपातळीवरील भारतीय जनता पक्षातील कार्यकारिणीत बदल करण्यात येणार असून, शहराध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवायचा असेल, तर भाजपातील सर्व गटांना बरोबर घेऊन जाणारा शहराध्यक्ष असावा, या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारभाराकडे लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रवादीच्या गडाला सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे. आगामी महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून शहराध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आला आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याच गटाचा शहराध्यक्ष असावा, यासाठी स्थानिक नेत्यांकडून गटप्रमुखांना गळ घालण्यात येत आहे. त्यामुळे सर्व गटांची मोट बांधणे हे मोठे आव्हान भाजपांच्या वरिष्ठ नेत्यांपुढे आहे. शहरामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे असे मूळ गट असून त्यामध्ये नेते एकनाथ खडसे, खासदार अमर साबळे, सचिन पटवर्धन, लक्ष्मण जगताप या गटांची भर पडणार आहे. त्यापैकी कोणाला संधी मिळणार याबाबतची चर्चा रंगू लागली आहे.(प्रतिनिधी)

Web Title: The City of BJP Changes in the Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.