शहर काँग्रेसला हवे आहे ढोलवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:10 AM2021-09-03T04:10:56+5:302021-09-03T04:10:56+5:30
पुणे : कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव शांततेत, गर्दी न करता साजरा करा, असे आवाहन सरकार करत आहे. ...
पुणे : कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव शांततेत, गर्दी न करता साजरा करा, असे आवाहन सरकार करत आहे. दुसरीकडे त्याच सरकारचा घटक असलेल्या काँग्रेसच्या शहर शाखेने मात्र पोलीस आयुक्तांकडे गणेशोत्सवात स्थिर ढोलवादन करू देण्याची मागणी केली आहे.
काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, तसेच काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक संजय बालगुडे यांच्यासह शहरातील मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन दिले. सुवर्णयुग तरुण मंडळाचे महेश सूर्यवंशी, बाबू गेनू मंडळाचे बाळासाहेब मारणे, गुरुजी तालीम मंडळाचे प्रवीण परदेशी, वीर हनुमान मित्र मंडळाचे दत्ता सागरे, गुरुदत्त मंडळाचे उदय महाले, पुणे बढाई समाज ट्रस्टचे शैलेश बढाई, सहकार तरुण मंडळाचे भाऊ करपे, गणेश पेठ पांगुळ आळी सार्वजनिक गणेश मंडळ ट्रस्टचे विलास ढमाले आदी यावेळी उपस्थित होते. उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे गणेश मंडळांना त्यांच्या परिसरात जाहिरात कमान टाकण्यास परवानगी द्यावी, मंडळांच्या समोर ढोल पथकांना स्थिर वादन करण्यास परवानगी द्यावी, सन २०१६ मधे मान्य नियमाप्रमाणे रनिंग मंडप (रस्त्यावर) टाकण्यास परवानगी द्यावी, अशा मागण्या निवेदनात आहेत.