चाकण शहरात प्लॅस्टिक वापरणाऱ्यांवर नगर परिषदेचा कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:28 AM2021-02-20T04:28:00+5:302021-02-20T04:28:00+5:30

प्लॅस्टिकमुळे होणारी पर्यावरणाची हानी थांबविण्याच्या दृष्टीने चाकण शहरात नगर परिषद पथकाने आजपासून शहरात ही धडक कारवाई सुरू केली आहे. ...

City council cracks down on plastic users in Chakan | चाकण शहरात प्लॅस्टिक वापरणाऱ्यांवर नगर परिषदेचा कारवाईचा बडगा

चाकण शहरात प्लॅस्टिक वापरणाऱ्यांवर नगर परिषदेचा कारवाईचा बडगा

Next

प्लॅस्टिकमुळे होणारी पर्यावरणाची हानी थांबविण्याच्या दृष्टीने चाकण शहरात नगर परिषद पथकाने आजपासून शहरात ही धडक कारवाई सुरू केली आहे.

शहरातील बाजारपेठ परिसरातील दुकाने व भाजीपाला विक्रेत्यांवर पथकामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली.शहरात प्लॅस्टिक वापरणाऱ्या व्यापाऱ्यांकडून पाचशे रुपयांपासून पाच हजार रुपये रोख दंड वसूल करण्यात आला आहे.तसेच प्लॅस्टिक पिशव्यांना पर्यायी कागदी किंवा कापडी पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांचे नगर परिषद प्रशासनाने कौतुक केले. शहरातील सर्व छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी कागदी किंवा कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन पालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

कोरोनाच्या काळामध्ये चाकण शहरातील प्लॅस्टिकविरोधी कारवाई बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतरच्या काळात मोठ्या प्रमाणात शहरातील व्यापारी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करीत असल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे वाढल्या होत्या.तसेच शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पुन्हा एकदा नगर परिषद मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगराध्यक्ष पांढरपट्टे यांच्या सहकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी प्रतिबंधात्मक प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकावर कारवाई करीत २०० किलो प्रतिबंधात्मक प्लॅस्टिक जप्त केले. तसेच काही व्यावसायिकांकडून पाचशे रुपये ते पाच हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.

ही कारवाई अधिक कडक करण्यात येणार असून, शहरातील सर्व दुकाने तसेच भाजीपाला विक्रेत्यांनी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करू नये असे आवाहन नगर परिषद प्रशासनाने केले आहे.

* चाकण शहरात प्लॅस्टिक बंदीला हरताळ या मथळ्याखाली लोकमतने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. शहरात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर वाढल्याने नगर परिषदकडून कारवाई करण्याची मागणी केली आहे.त्यानुसार पालिका प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली आहे.

--

कोट

-चाकण शहरातील नागरिकांनीच स्वतःहून प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर बंद केला तर आपोआपच प्लॅस्टिकला प्रतिबंध होईल. प्लॅस्टिकमुक्त चाकण शहर करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. - नानासाहेब कामठे,मुख्याधिकारी,चाकण, नगर परिषद.

--

फोटो - चाकण शहरात प्लॅस्टिक कारवाई करताना नगर परिषद

Web Title: City council cracks down on plastic users in Chakan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.