शहरात गुरुवारी पाणी नाही

By admin | Published: June 16, 2015 12:40 AM2015-06-16T00:40:46+5:302015-06-16T00:40:46+5:30

पर्वती जलशुद्धीकरण केंद्रासह लष्कर, वडगाव, वारजे, एसएनडीटी आणि नवीन होळकर या सर्व जलकेंद्रांतील अत्यावश्यक विद्युत आणि तातडीची स्थापत्य

The city does not have water on Thursday | शहरात गुरुवारी पाणी नाही

शहरात गुरुवारी पाणी नाही

Next

पुणे : पर्वती जलशुद्धीकरण केंद्रासह लष्कर, वडगाव, वारजे, एसएनडीटी आणि नवीन होळकर या सर्व जलकेंद्रांतील अत्यावश्यक विद्युत आणि तातडीची स्थापत्य विषयक कामे करण्यात येणार असल्याने येत्या गुरुवारी (दि. १८) रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

पर्वती जलकेंद्र : सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन, शिवाजीनगर, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वती, सहकारनगर, सातारा रस्ता, बिबवेवाडी, कर्वे रस्ता, एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूलर कॉलनी, विधी महाविद्यालय रस्ता.
वडगाव जलकेंद्र : हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, भारती विद्यापीठ परिसर
लष्कर जलकेंद्र : लष्कर, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, हडपसर
वारजे/ एसएनडीटी जलकेंद्र : पाषाण, औंध, पाषाण, खडकी, चतु:शृंगी परिसर, गोखलेनगर, जनवडी, रेंज हिल्स, बावधन, किश्किंधानगर.

Web Title: The city does not have water on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.