शहराला मिळाले तीन नवे पोलिस अधिकारी; उपायुक्त विजयकुमार मगर यांची लातूरला बदली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 09:35 PM2024-08-07T21:35:05+5:302024-08-07T21:35:26+5:30
नांदेड परिक्षेत्राचे अधीक्षक राजकुमार शिंदे यांची पुणे पोलिस दलात पोलिस उपायुक्त पदी वर्णी लागली आहे.
पुणे - आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलिस सेवेतील १५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. बुधवारी संध्याकाळी यासंबंधीचे आदेश गृह विभागाकडून काढण्यात आले. पुणे शहरातून पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांची लातूर येथील पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे प्राचार्य पदी बदली करण्यात आली. तसेच शहराला तीन नवे पोलिस उपायुक्त देखील मिळाले.
गोंदियाचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, हिंगोलीचे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर आणि लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे नांदेड परिक्षेत्राचे अधीक्षक राजकुमार शिंदे यांची पुणे पोलिस दलात पोलिस उपायुक्त पदी वर्णी लागली आहे.
पीएमआरडीएच्या दक्षता अधिकाऱ्यांची देखील बदली..
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चे दक्षता धिकारी (पोलिस अधीक्षक) दिगंबर प्रधान यांची मुंबई येथे पोलिस उपायुक्त म्हणून बदली झाली.