शहरात मंगळवारी वाढले १९२५ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:12 AM2021-03-17T04:12:08+5:302021-03-17T04:12:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सलग वाढ सुरुच असून मंगळवारी दिवसभरात १९२५ रूग्णांची वाढ झाली. तर, ...

The city grew to 1925 patients on Tuesday | शहरात मंगळवारी वाढले १९२५ रुग्ण

शहरात मंगळवारी वाढले १९२५ रुग्ण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सलग वाढ सुरुच असून मंगळवारी दिवसभरात १९२५ रूग्णांची वाढ झाली. तर, बरे झालेल्या ६७७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३९४ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १३ हजार २२५ झाली आहे.

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३९४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ७९८ रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. दिवसभरात ७ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ९६९ झाली आहे. पुण्याबाहेरील एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दिवसभरात एकूण ६७७ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २ लाख ३ हजार १६ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या २ लाख २१ हजार २१० झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या १३ हजार २२५ झाली आहे.

-------------

दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ८ हजार ४४ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १२ लाख ६३ हजार ६९६ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

Web Title: The city grew to 1925 patients on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.