शहरात यापुढे एकाच पद्धतीचे शास्त्रीय गतीरोधक : पालिकेकडून नियमावली तयार 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 09:36 PM2019-04-04T21:36:42+5:302019-04-04T21:38:28+5:30

अनेकदा रस्त्यांवर अशास्त्रीय आणि बेकायदा गतीरोधक उभारले जातात. या गतीरोधकांमुळे वाहनांची गती कमी होण्याऐवजी अपघातच अधिक घडतात. इंडीयन रोड कॉंग्रेस (आयआरसी) च्या निकषांचे पालनच केले जात नाही.

The city is no longer a classical anti-blocking system: preparing the rules by the corporation | शहरात यापुढे एकाच पद्धतीचे शास्त्रीय गतीरोधक : पालिकेकडून नियमावली तयार 

शहरात यापुढे एकाच पद्धतीचे शास्त्रीय गतीरोधक : पालिकेकडून नियमावली तयार 

Next

पुणे : अनेकदा रस्त्यांवर अशास्त्रीय आणि बेकायदा गतीरोधक उभारले जातात. या गतीरोधकांमुळे वाहनांची गती कमी होण्याऐवजी अपघातच अधिक घडतात. इंडीयन रोड कॉंग्रेस (आयआरसी) च्या निकषांचे पालनच केले जात नाही. याची गंभीर दखल घेण्यात आली असून यापुढे महापालिकेकडून शहरातील रस्त्यांवर एकाच पद्धतीचे आणि एकाच आकाराचे गतीरोधक बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी नवीन नियमावली तयार करण्यात आली असून तिची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे. 

शहरामध्ये वाहतूक विषयक सुधारणा करण्यासाठी महापालिका, वाहतूक पोलीस, आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीच्या बैठकीमध्ये ही नियमावली मांडण्यात आली आहे. सद्यस्थितीमध्ये रस्त्यांवर असलेले गतीरोधक अशास्त्रिय स्वरुपाचे असतात. उंची, रुंदीचे निकष पाळले जात नाहीत. या गतीरोधकांमुळे अनेकांना मणक्यांचे आजारही जडल्याची उदाहरणे आहेत. मात्र, यापुढे आयआरसीच्या निकषांनुसारच गतीरोधक उभारण्यात येणार आहेत. यापुर्वी बनविण्यात आलेल्या नियमावलीमध्ये आयआरसीने बदल केले आहेत. या बदलांचा नव्या नियमावलीमध्ये पालिकेने समावेश केला आहे. ही नविन नियमावली समितीपुढे मांडण्यात आली. त्याला समितीने मंजुरी दिली आहे. 

रस्त्यावर गतीरोधक येण्यापुर्वी वाहनचालकांना सुचना मिळावी याकरिता फलक लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. गतीरोधक येण्यापुर्वी 40 मीटर अंतरावर 60 सेंटीमीटर आकाराचे हे फलक असणे आवश्यक आहे. तसेच गतीरोधकाच्या आधी पाच मीटरवर थर्मोप्लॅस्ट रंगाने रब्मलर स्ट्रीप करणे आवश्यक आहे. तसेच गतीरोधक आयआरसीने दिलेल्या नियमानुसारच रंगवणे आवश्यक आहे. प्रत्येक चौकामध्ये झेब्रा क्रॉसिंग हे गुणवत्तापूर्वक रंगाने रंगवणे बंधनकारक आहे. तसेच प्रत्येक गतीरोधकाच्या ठिकाणी पुरेशी प्रकाशयोजना असणे आवश्यक आहे. 

रस्त्याची जेवढी रुं दी असेल तेवढ्या रुंदीवर रम्ब्लर स्ट्रीपच्या सुरुवातीला कॅट्स आय (पिवळ्या रंगाचे) लावणे आवश्यक आहे. रस्त्यावरील वाहने गतीरोधकावरून पदपथांवर जाऊ नये यासाठी पदपथांच्या कडेने आणि स्पीडब्रेकरच्या बाजूला प्लास्टिकचे बोलार्डस लावण्यात यावेत. गतीरोधकाच्या ठिकाणी पाणी साचू नये यासाठी पाण्याचा निचरा होणे आवश्यक असल्याचे आणि त्यासंदर्भात उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ही नियमावली मुख्यसभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येईल, त्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. 

- राजेंद्र निंबाळकर, अतिरीक्त आयुक्त (विशेष), पुणे महापालिका 

गतीरोधकांसंदर्भात नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीमध्ये वाहनांची गती कमी करणे, माहिती फलक लावणे, त्याची देखभाल दुरुस्ती या बाबींचा गांभिर्याने विचार करण्यात आला आहे. आयआरसीच्या निकषांचे पालन केले जाणार आहे. शहरात सर्वत्र एकाच पद्धतीचे गतीरोधक यापुढे केले जातील. त्याव्यतिरीक्त मान्यतेशिवाय रस्त्याच्या मध्ये कोणी बेकायदा गतीरोधक बांधले तर त्याच्याविरुद्ध फौजदारी स्वरुपाची कारवाई केली जाऊ शकते. 

Web Title: The city is no longer a classical anti-blocking system: preparing the rules by the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.