नगराध्यक्षांनी दिली शहर विकासाची ग्वाही

By admin | Published: January 6, 2017 06:29 AM2017-01-06T06:29:28+5:302017-01-06T06:29:28+5:30

जिल्ह्यातील १० नगरपालिकांच्या नुकत्याच निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांना शुभेच्छा देऊन त्यांचा सन्मान करण्याचे अभिनव

City President assured the development of the city | नगराध्यक्षांनी दिली शहर विकासाची ग्वाही

नगराध्यक्षांनी दिली शहर विकासाची ग्वाही

Next

पुणे : जिल्ह्यातील १० नगरपालिकांच्या नुकत्याच निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांना शुभेच्छा देऊन त्यांचा सन्मान करण्याचे अभिनव पाऊल 'लोकमत'ने उचलले. या सर्व नगराध्यक्षांना शुक्रवारी ‘लोकमत’ कार्यालयात निमंत्रित करून त्यांचा गौरव करण्यात आला. या वेळी सर्व नगराध्यक्षांनी पक्षविरहित राजकारण करून शहर विकासालाच प्राधान्य राहणार असल्याची ग्वाही 'लोकमत' व्यासपीठावरून दिली.
‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई व राकेश मल्होत्रा यांच्या हस्ते या नगराध्यक्षांना पुणेरी पगडी, उपरणे, पुष्पगुच्छ व ‘लोकमत’ दीपोत्सव देऊन सन्मानित करण्यात आले.
दौंडच्या नागरी हित संरक्षण मंडळ आघाडीच्या शीतल कटारिया, आळंदीच्या भाजपाच्या वैजयंता उमरगेकर, जेजुरीच्या काँग्रेसच्या वीणा सोनवणे, सासवडचे काँग्रेसचेमार्तंड भोंडे, तळेगावच्या भाजपाच्या चित्रा जगनाडे, लोणावळ्याच्या भाजपाच्या सुरेखा जाधव आदी नगराध्यक्ष व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.
या वेळी संपादक विजय बाविस्कर म्हणाले, पुणे जिल्ह्यातील नगराध्यक्षांना एकत्रित आणून त्यांना सन्मानित करणारे ‘लोकमत’ हे राज्यातील एकमेव दैैनिक आहे. तुम्ही थेट जनतेतून निवडून आले आहात. त्यामुळे लोकांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे स्वप्न मतदारांनी तुमच्यामार्फत पाहिले आहे. नगराध्यक्ष हा निवडणुकीनंतर पक्षाचा न राहता त्या संपूर्ण शहराचा व्हावा. पक्षीय राजकारणात न अडकता उदारमतवादी होऊन त्या शहराचे प्रश्न सोडवावेत. शहरवासीयांच्या आशा आकांक्षा आपण पूर्ण कराल, अशी अपेक्षा आहे.
सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भांडे यांनी, ‘लोकमत’ने सत्कार करून आमचा उत्साह, कामाची ऊर्मी वाढविली असून, लोकामंधून निवडून आल्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे, असे सांगितले.
जेजुरीच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी या वेळी जेजुरीकरांनी नवनिर्वाचितांना संधी दिली, त्या संधीचे सोनं करू. गृहिणी म्हणून आतापर्यंत जबाबदारी पार पाडली आता शहराची कारभारीण म्हणूनही ती तेवढीच सक्षमपणे पार पाडू, असे आश्वासन या वेळी दिले.
तळेगावच्या नगराध्यक्षा चित्रा जनगाडे यांनी, निवडणुका संपताच पक्षीय राजकारण संपते. पक्षापेक्षा नगराध्यक्ष लोकांचा होता. याची जाणीव ठेवून पुढील काळात शहरविकासाचे काम करणार असल्याचे सांगितले.
लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी सांगितले की, आमची चांगली कामं ‘लोकमत’मुळे लोकांपर्यंत पोहोचली, त्यामुळे ‘लोकमत’चे आभार. पहिल्यांदाच नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून आल्यामुळे आता ५ वर्षे काम करता येणार आहे. पूर्वी नगराध्यक्षपदाचा खो-खो व्हायचा. त्यात शहराचे मोठे नुकसान होत होते. आता पुढील पाच वर्षांत नियोजनबद्ध काम करता येणार आहे. लोणावळाकरांचे स्वप्न साकार करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
दौंडच्या नगराध्यक्षा शीतल कटारिया व आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी ‘लोकमत’ने सत्कार केल्याने आमची जबाबदारी वाढली असून शहरविकासाची ग्वाही दिली. या वेळी नगराध्यक्षांबरोबर काही नगरसेवक व काही पक्षाचे पदाधिकारीही आले होते. त्यांचाही ‘लोकमत’ने सत्कार केला.
यात योगेश कटारिया, अशोक उमरगेकर उर्फ कांबळे, प्रमिला राहणे, पारूबाई तापकीर, सागर भोसले, रामभाऊ भोसले, हेमंत सोनवणे, अनिल उरवणे, माऊली यादव, मिलिंद जगताप, श्रीधर पुजारी, हर्षल होगले, संदीप जनगाडे आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: City President assured the development of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.