पुणे शहरात ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची संख्या कमी, तर परदेशी वृक्षांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 02:28 PM2021-05-12T14:28:41+5:302021-05-12T14:28:49+5:30

उपनगरात हिरवाई, पेठा ओसाड असून वृक्ष लागवडीची गरज

In the city of Pune, the number of trees providing oxygen decreased, while the number of foreign trees increased | पुणे शहरात ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची संख्या कमी, तर परदेशी वृक्षांची संख्या वाढली

पुणे शहरात ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची संख्या कमी, तर परदेशी वृक्षांची संख्या वाढली

googlenewsNext
ठळक मुद्देशहरातील वृक्षसंख्येने ४८ लाखांचा टप्पा गाठला

पुणे: शहरात सर्वत्र सिमेंटचे जंगल झाले आहे. दिवसेंदिवस वृक्षांचे प्रमाण कमी होत चालले आहे. परिणामी प्रदूषण वाढल्याने सर्वाना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. ऑक्सिजनचे महत्व कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत सर्वांना कळू लागले आहे. शहरातील वृक्षसंख्येने ४८ लाखांचा टप्पा ओलांडला असला तरी त्यामध्ये परदेशी झाडांचे प्रमाण जास्त आहे. शहरात देशी वृक्षांपासून ऑक्सिजन मिळत असल्याने त्या वृक्षांची लागवड करण्यावर भर देणे गरजेचे आहे. असे वनस्पती तज्ञांनी सांगितले आहे. 

महापालिकेच्या ऊद्यान विभागाने एका खासगी कंपनीच्या साहाय्याने ही वृक्षगणना केली आहे. एका वृक्षाची प्रचलित नाव, शास्त्रीय नाव, पाने, फुले, फळ,  ठिकाण, वय, मालकी अशा तब्बल १६ प्रकारांची माहिती संगणकात साठवून ठेवण्यात आली आहे. असे ४० लाख वृक्ष मोजून झाले आहेत. आणखी ८ लाख वृक्षांची अशीच नोंद करण्याचे काम सुरू आहे.

सहकारनगर, कात्रज, बिबवेवाडी, येरवडा अशा  उपनगरांमध्ये वृक्षांची संख्या काही लाखात असताना कसबा, भवानी पेठ, रास्ता, नाना  तसेच अन्य मध्यभागांमध्ये मात्र ही संख्या केवळ काही हजारांमध्ये आहे. शहरातील सर्वाधिक व्रुक्षसंख्या सहकारनगर परिसरात आहे. धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक म्हणजे १० लाख १५ हजार १४४ व्रुक्ष आहेत. सर्वात कमी म्हणजे फक्त १२ हजार ४७४ वृक्ष भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आहेत. आंबा, वड, पिंपळ, अशा दिवसा जास्त ऑक्सिजन देणाऱ्या देशी वृक्षांची संख्या यात कमी आहे. गिरीपुष्प झाडांची संख्या ९ लाख १९ हजार आहे. कडुलिंबाच्या झाडांची १ लाख ९ हजार ३८५ आहे. आंब्याची झाडे ७३हजार ८५२ आहेत. अशोकाची झाडेही काही लाखांमध्ये आहे.

वनस्पती तज्ञ डॉ हेमा साने यांनी सांगितले कि, देशी व्रुक्ष, व त्यातही वड, पिंपळ अशा आकाराने मोठी व दाट पाने असलेल्या झाडांची लागवड मोठ्या संख्येने करायला हवी. हे व्रुक्ष जास्तीत जास्त ऑक्सिजन सोडतात ज्याचा मानवाला ऊपयोग आहे व कार्बनही तेवढाच शोषून घेतात जो मानवाला हानीकारक आहे. 

परदेशी झाडांची संख्या काही वर्षात वाढली असल्याचे नोंदणी करणाऱ्यांचे निरीक्षण आहे. निरनिराळे व्रुक्षतज्ज्ञ देशी झाडे लावा, परदेशी व्रुक्ष लागवड करू नका असे आवाहन सातत्याने करत असतानाही त्या व्रुक्षाच्या दिसण्याच्या आकर्षणापोटी अशाच व्रुक्षांची लागवड वाढत असल्याचे व्रुक्षगणना करणाऱ्यांचे म्हणणे आहे.

                                                                                                          योगेश कुटे- कंपनी प्रतिनीधी

 

Web Title: In the city of Pune, the number of trees providing oxygen decreased, while the number of foreign trees increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.