शहर बचाव समिती मैदानात

By admin | Published: December 13, 2015 02:58 AM2015-12-13T02:58:47+5:302015-12-13T02:58:47+5:30

महापालिकेची कंपनी करून मूठभर नागरिकांच्या हितासाठी शहराची विकासाची दिशा घातक पातळीवर नेण्याचा घटनाबाह्य प्रकल्प स्मार्ट सिटीच्या नावाने पुणेकरांच्या माथी मारला

City Rescue Committee on the ground | शहर बचाव समिती मैदानात

शहर बचाव समिती मैदानात

Next

पुणे : महापालिकेची कंपनी करून मूठभर नागरिकांच्या हितासाठी शहराची विकासाची दिशा घातक पातळीवर नेण्याचा घटनाबाह्य प्रकल्प स्मार्ट सिटीच्या नावाने पुणेकरांच्या माथी मारला जात असून, या प्रकल्पास विरोध करण्यासाठी शहरातील स्वयंसेवी संस्था, संघटना तसेच राजकीय पक्षांच्या वतीने पुणे शहर बचाव समितीची स्थापना करण्यात आली आहे.
या समितीच्या वतीने येत्या सोमवारी (दि. १४) सकाळी १० वाजल्यापासून महापालिकेबाहेर ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी महापौर भाई वैद्य यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याच दिवशी मुख्य सभेत हा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. समितीच्या शनिवारी झालेल्या पहिल्या वहिल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉंम्रेड अजित अभ्यंकर यांनी दिली.
या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, केंद्र शासनाच्या आदेशानुसार, महापालिका प्रशासनाने ठेवलेल्या या प्रस्तावात पुण्याला जागतिक दर्जाचे शहर बनविण्याच्या नावाखाली औंध-बाणेर-बालेवाडी भागातील ४० हजार नागरिकांसाठी तब्बल २८०० कोटींचा खर्च केला जाणार आहे तर उर्वरित
४० लाख पुणेकरांसाठी ७८०
कोटींचा खर्च केला जाणार आहे. मात्र, त्यासाठी नेमण्यात येणाऱ्या एसपीव्हीची माहिती न देताच या कंपनीला खर्चाचे अधिकार दिले जाणार आहेत.
त्यासाठी पुणेकरांचे नाव पुढे करीत नगरसेवकांना पुढे करून हा प्रस्ताव मान्य करण्याचा घाट घालण्यात आला आहे. एकीकडे गेल्या १३ वर्षांपासून शहराचा विकास आराखडा मान्येसाठी पडून असताना, राज्यशासन या प्रस्तावाच्या मान्यतेची घाई करत आहे.
त्याला नगरसेवकांनी आपल्या लोकशाही मार्गाने दिलेल्या अधिकाराने विरोध केला आहे. मात्र, त्यांच्या या अधिकाराला आव्हान देत
महापालिका प्रशासन महानगर पालिका अधिनियम ४४८ चा वापर करून नगरसेवकांना बदनाम व ब्लॅकमेल करत आहे.
या प्रकल्पातील तरतूदी पाहता
त्यात सरळ सरळ छुपे हितसंबध असल्याचे दिसून येते. त्यामुळे या प्रकल्पास सर्व ताकदीनिशी विरोध करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.
या बैठकीस युवाजन सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अभिजित वैद्य, राष्ट्रवादी कामगार सेलचे उपाध्यक्ष अ‍ॅड. म. वि. अकोलकर, शहर
नियोजन तज्ज्ञ अनिता बेंनजिर, परिसरचे सुजीत पटवर्धन, नगरसेवक डॉ. सिध्दार्थ धेंडे, महाराष्ट्र कामगार मंचाचे दिलीप मोहीते, भारीप बहुजन महासंघाच्या वैशाली चांदणे,
जनवादी महिला संघटनेच्या किरण मोघे, सिटूचे वसंत पवार, कागद
काच पत्र पंचायतीचे विष्णू
श्रीमांगले, युवा भारतीचे अँड. भूषण पवार, रिपब्लीकन विद्यार्थी परिषदेचे सतिश गायकवाड, एसएफआयचे विलास साबळे उपस्थित होते.

- पुण्याला ‘स्मार्ट सिटी’ बनवण्यासाठी केंद्र शासनाच्या आदेशानुसार, महापालिका प्रशासनाने ठेवलेल्या या प्रस्तावात पुण्याला जागतिक दर्जाचे शहर बनविण्याच्या नावाखाली औंध-बाणेर-बालेवाडी भागातील ४० हजार नागरिकांसाठी तब्बल २८०० कोटींचा खर्च केला जाणार आहे तर उर्वरित ४० लाख पुणेकरांसाठी ७८० कोटींचा खर्च केला जाणार आहे.

Web Title: City Rescue Committee on the ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.