नगर रस्ता बनला मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:11 AM2021-02-24T04:11:30+5:302021-02-24T04:11:30+5:30

पीएमपी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे बीआरटीच्या मार्गावर पीएमपीच्या बस कमी आणि खासगी वाहनेच जास्त प्रवास करत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

The city road became a death trap | नगर रस्ता बनला मृत्यूचा सापळा

नगर रस्ता बनला मृत्यूचा सापळा

Next

पीएमपी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे बीआरटीच्या मार्गावर पीएमपीच्या बस कमी आणि खासगी वाहनेच जास्त प्रवास करत असल्याचे पाहायला मिळत आहे. बीआरटी मार्गावर खासगी वाहनांची घुसखोरी थांबविण्यासाठी नेमण्यात आलेले वार्डन सध्या दिसत नाहीत तर बहुतांश मार्गावर खासगी वाहनांना रोखण्याकरिता कुठल्याही प्रकारची यंत्रणा उपलब्ध नाही, अशी वाईट परिस्थिती आहे.

चौकट

बसला वेगाचे नियंत्रण हवे...

नगर रस्त्यावर कोंडी असल्यामुळे दुचाकीस्वार किंवा चारचाकी वाहने बीआरटी मार्गात वाहन चालवतात. त्यामुळे प्रत्येकाने वेगावर नियंत्रण ठेवले पाहिजे. पीएमपीनेही बसचालकांना बसच्या वेगावर नियंत्रणाबाबत सूचना दिल्या पाहिजेत. बीआरटी मार्गातील त्रुटींचे लेखी निवेदन युवक काँग्रेसचे अध्यक्ष अभिजित रोकडे यांनी पीएमपीच्या अधिकार्यांना दिले असून नगर रस्ता बीआरटीतील त्रुटी येत्या १५ दिवसांत दूर न केल्यास आंदोलनचा इशाचा रोकडे यांनी पीएमपीला दिला.

Web Title: The city road became a death trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.