शहरात रविवारी वाढले ९८४ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:12 AM2021-03-08T04:12:47+5:302021-03-08T04:12:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सलग वाढ सुरूच असून रुग्णांचा आकडाही वाढला आहे. रविवारी दिवसभरात ९८४ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सलग वाढ सुरूच असून रुग्णांचा आकडाही वाढला आहे. रविवारी दिवसभरात ९८४ रुग्णांची वाढ झाली, तर बरे झालेल्या ७५० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३४१ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ६ हजार ६६९ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३४१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ६८२ रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. दिवसभरात ५ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ८९० झाली आहे. पुण्याबाहेरील एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिवसभरात एकूण ६८२ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ९६ हजार ७५१ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या २ लाख ८ हजार ३३० झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ६ हजार ६६९ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ६ हजार ७४३ नागरिकांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ११ लाख ९२ हजार २ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.