संत सोपानकाका महाराजांच्या पादुकांची नगरप्रदक्षिणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:09 AM2021-01-10T04:09:31+5:302021-01-10T04:09:31+5:30

देऊळवाड्यातील वीणा मंडपात सकाळी ६ ते ८ या यावेळेत सोपानमहाराज वाईकर, तर सकाळी ९ ते ११ वाजता गेनबा महाराज ...

City tour of Padukan of Saint Sopankaka Maharaj | संत सोपानकाका महाराजांच्या पादुकांची नगरप्रदक्षिणा

संत सोपानकाका महाराजांच्या पादुकांची नगरप्रदक्षिणा

Next

देऊळवाड्यातील वीणा मंडपात सकाळी ६ ते ८ या यावेळेत सोपानमहाराज वाईकर, तर सकाळी ९ ते ११ वाजता गेनबा महाराज पवार यांचे कीर्तन झाले. तर ११ ते दु. १ पर्यंत हरिपाठ, अभंगवाणी झाली. दुपारी ४ वाजता मानकरी आण्णासाहेब केंजळे, देवस्थानचे प्रमुख ॲड. त्रिगुण गोपाळ गोसावी यांनी देवघरातून सोपानकाकांच्या पादुका आणून वीणामंडपातील पालखीमध्ये विधिवत स्थानापन्न केल्या. नंतर पादुकांची पालखीतून नगरप्रदक्षिणा झाली. रात्री ९ ते ११ लक्ष्मणबुवा एदलाबादकर यांचे कीर्तन होऊन जागर झाला.

सोमवारी (दि ११) सकाळी ९ ते ११ वा संत नामदेव महाराजांचे वंशज केशव महाराज नामदास यांचे संत सोपानकाका महाराजांच्या समाधी वर्णनाचे कीर्तन होणार आहे. याच दिवशी सकाळी ११ ते दुपारी १ वा हभप कोकाटे महाराजांचे काल्याचे कीर्तन होऊन नंतर दहीहंडी व दिंडी प्रदक्षिणा होणार असल्याची माहिती श्री सोपानदेव समाधी मंदिर ट्रस्टचे ॲड. त्रिगुण गोसावी यांनी दिली.

फोटोओळ :- सासवड येथे संत सोपानकाका महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त पादुकांची पालखीतून ग्रामप्रदक्षिणा झाली.

Web Title: City tour of Padukan of Saint Sopankaka Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.