शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 06:02 PM2018-09-25T18:02:42+5:302018-09-25T18:02:50+5:30

पर्वती जलकेंद्र , पंपींग, वडगाव जलकेंद्र, लष्कर, एसएनडीटी जलकेंद्र, नवीन होळकर पुल पंपींग याठिकाणी विद्युत विषयक विविध कामे करण्यात येणार आहेत.

City water closed on Thursday | शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद 

शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद 

googlenewsNext
ठळक मुद्देशुक्रवार (दि.२८) रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार

पुणे: पर्वती जलकेंद्र , पंपींग, वडगाव जलकेंद्र, लष्कर, एसएनडीटी जलकेंद्र, नवीन होळकर पुल पंपींग याठिकाणी विद्युत विषयक विविध कामे करण्यात येणार आहेत. यामुळे येत्या गुरुवार (दि.२७) रोजी संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवार (दि.२८) रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.या भागातील पाणी पुरवठा बंद  असणार पर्वती जलकेंद्र:  शहरातील सर्व पेठा, दत्तावाडी. राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकुंद नगर, पर्वती गाव, सहकारनगर, पद्मावती, तळजाई, बिबवेवाडी, कोथरुड, डहाणूकर कॉलनी,वडगाव जलकेंद्र परीसर: हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, कात्रज, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा, चतुःश्रुंगी,एसएनडीटी, वारजे जलकेंद्र: पाषाण, औंध,खडकी, गोखलेनगर, जनवाडी, बावधन, रामबाग कॉलनी,गणेशनगर, पुणे विद्यापीठ ,वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, अतुलनगर, शाहू कॉलनी, सुतारवाडी, भुगाव रस्ता. 
लष्कर व नवीन जलकेंद्र : लष्कर, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता म कोरेगाव पार्क,ताडीवाला रस्ता, रेसकोर्स, कोंढवा हडपसर, महमंदवाडी, कोळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणीनगर, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, सोलापुर रस्ता, सातववाडी,नवीन होळकर पंपींग परीसर :  विद्यानगर, टिंगरेनगर, कळस , धानोरी, विश्रांतवाडी, विमाननगर, नगर रोड इत्यादी परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Web Title: City water closed on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.