शहराचा पाणीपुरवठा आज बंद राहणार
By admin | Published: March 10, 2016 01:21 AM2016-03-10T01:21:24+5:302016-03-10T01:21:24+5:30
पर्वती जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र, नवीन होळकर पंपिंग स्टेशन येथील विद्युत व स्थापत्य विषयक अत्यावश्यक कामे गुरुवारी (दि. १०) केली जाणार असल्याने शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी
पुणे : पर्वती जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र, नवीन होळकर पंपिंग स्टेशन येथील विद्युत व स्थापत्य विषयक अत्यावश्यक कामे गुरुवारी (दि. १०) केली जाणार असल्याने शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी, शिवाजीनगर, स्वारगेट, बिबवेवाडी, कोथरूड, लॉ कॉलेज रोड, सिंहगड रस्ता, औंध, पाषाण, बाणेर, चतु:शृंगी परिसर आदी भागांचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहील. त्याचबरोबर या भागांना शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.
पाणीपुरवठा बंद असणारे भाग
पर्वती जलकेंद्र : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वतीदर्शन, मुकुंदनगर, पर्वती, सहकारनगर, सातारा रस्ता, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रस्ता, एसएनडीटी, एरंडवणा, कोथरूड, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रस्ता, सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे नं. ४२, ४६ (कोंढवा खुर्द), पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र.
वडगाव जलकेंद्र : हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ, कोंढवा बुद्रुत्क.
नवीन होळकर पंपिंग : विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर व नगररस्ता.(प्रतिनिधी)चतु:शृंगी, एसएनडीटी,
वारजे जलशुद्धीकरण केंद्र :
पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:शृंगी, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, गणंजय सोसायटी, एकलव्य महाविद्यालयाचा भाग, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, वारजे महामार्ग परिसर, वारजे, माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुद्धीकरण भाग, औंध, बावधन, सूस, सुतारवाडी, भूगाव रस्ता परिसर.