दुरुस्तीच्या कामामुळे शहराचा पाणीपुरवठा उद्या राहणार बंद
By admin | Published: March 8, 2017 05:08 AM2017-03-08T05:08:34+5:302017-03-08T05:08:34+5:30
शहरातील पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे येथील जलकेंद्रांमध्ये काही दुरुस्ती कामांमुळे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (दि.९ मार्च) बंद राहणार आहे.
पुणे : शहरातील पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे येथील जलकेंद्रांमध्ये काही दुरुस्ती कामांमुळे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (दि.९ मार्च) बंद राहणार आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा परिसर पर्वती जलकेंद्र भाग : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वतीदर्शन, पर्वतीगाव, सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रोड ते एसएनडीटी, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोन, मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, पद्मावती टँकर भरणा केंद्र.
वडगाव जलकेंद्र परिसर : हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ, कोंढवा बुद्रुक.
चतु:शृंगी, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र परिसर : पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:शृंगी, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, किष्किंदानगर, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलनी, महात्मा सोसायटी, वारजे हायवे, वारजे-माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, शाहूकॉलनी, वारजे जलशुद्धीकरण परिसर, औंध, बावधन, सूस, सुतारवाडी, भूगाव रोड.
नवीन होळकर पंपिंग परिसर : विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, नगर रोड.
लष्कर जलकेंद्र परिसर : लष्कर भाग, पुणे स्टेशन, कोरेगाव पार्क, ताडीवाला रोड, रेसकोर्स, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, येरवडा, विश्रांतवाडी, कल्याणीनगर, महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदननगर, खराडीे.