पुणे विद्यापीठात नागरी स्वच्छता व पाणीपुरवठाविषयक अभ्यासक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 07:55 PM2018-08-08T19:55:59+5:302018-08-08T19:56:40+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नागरी स्वच्छता अाणि पाणीपुरवठा विषयी अभ्यासक्रम सुरु हाेत अाहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नागरी स्वच्छता अाणि पाणीपुरवठा विषयी अभ्यासक्रम सुरु हाेत अाहे. देशात प्रथमच विद्यापीठ स्तरीय शिक्षणात अशा प्रकारच्या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात अाला अाहे. याबाबतची माहिती विभागप्रमुख डाॅ. सुरेश गाेसावी यांनी दिली.
गाेसावी म्हणाले, देशात अातापर्यंत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी नागरी स्वच्छता अाणि पाणी पुरवठा व्यवस्थापन याविषयी अभ्यासक्रम उपलब्ध नव्हता. पुणे विद्यापीठात पहिल्यांदाच असा अभ्यासक्रम सुरु हाेत अाहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी दाेन वर्षांचा अाहे. त्यासाठी विद्यापीठाने नेदरलॅंडची अायएचई ही जगभरात पाणी विषयावर काम करणारी संस्था अाणि पुण्यातील युनिटी कन्सल्टंट यांच्याशी सहकार्य करार केला अाहे. हा अभ्यासक्रम 10 सप्टेंबर राेजी सुरु हाेणार अाहे. या विषयीची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या campus.unipune.ac.in या संकेतस्थळावर डिपार्टमेंट अाॅफ एनवायरमेंट स्टडीज या विभागामध्ये मिळू शकणार अाहे.
या अभ्यासक्रमासाठी अत्याधुनिक पद्धतीने अध्यापन केले जाणार अाहे. अायएचई संस्थेतील तज्ज्ञ व्हिडीअाे काॅन्फरन्सिंग अाणि वेबिनार या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. तसेच, पुण्यातील युनिटी कन्सल्टंटच्या वतीनेही काही मान्यवर विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमावर अाधारित इत्यंभूत माहिती देण्यासाठी विद्यापीठाला सहाय्य करतील. तसेच पर्यावरणशास्त्र विभागातील प्राध्यपकही या अभ्यासक्रमासाठी अध्यापन करतील अशी माहितीही डाॅ. गाेसावी यांनी दिली.