स्थापत्य अभियंते राम चौधरी यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:11 AM2021-04-27T04:11:53+5:302021-04-27T04:11:53+5:30
पुणे : सार्वजनिक क्षेत्रात ‘रामकाका’ म्हणून परिचित असलेले स्थापत्य अभियंते राम चौधरी (वय ८७) यांचे कोरोनाने निधन झाले. देशभरात ...
पुणे : सार्वजनिक क्षेत्रात ‘रामकाका’ म्हणून परिचित असलेले स्थापत्य अभियंते राम चौधरी (वय ८७) यांचे कोरोनाने निधन झाले. देशभरात उच्च गुणवत्तेचे रस्ते आणि विमानतळ अशी सार्वजनिक बांधकामे त्यांनी केली.
त्यांच्या पश्चात व्यावसायिक अभय व सुनील हे चिरंजीव तसेच सुना, नातवंडे आणि पतवंडे असा परिवार आहे. प्राज कंपनीचे प्रमुख प्रमोद चौधरी हे त्यांचे पुतणे होत. नगर येथील स्वातंत्र्यसैनिक दादा चौधरी आणि रुक्मिणीबाई चौधरी यांचे राम हे सर्वांत धाकटे पुत्र होत. बालपण हलाखीत गेलेले असतानाही परिस्थितीवर मात करून त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले व ते सरकारी सेवेत दाखल झाले.
निवृत्तीनंतर ते पुण्यात स्थायिक झाले. त्यानंतर त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना पदरमोड करून शिकवले. नगर येथील स्नेहालय आणि दादा चौधरी विद्यालय या संस्थांशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध होता. विद्यालयाचा कायापालट करण्याचा ध्यास त्यांनी घेतला होता. तेथे त्यांनी पेटी वाचनालय सुरू केले.
स्नेहालयच्या पुण्यातील विस्तारासाठी त्यांनी मदत केली. अनेक वर्षे चौधरी यांनी नगर मित्र मंडळाची धुरा सांभाळली.
--------