भारनियमनामुळे नागरिक त्रस्त

By Admin | Published: June 15, 2014 04:27 AM2014-06-15T04:27:09+5:302014-06-15T04:27:09+5:30

येथे दुपारी दोन तास होणाऱ्या भारनियमनामुळे अधिकारी व नागरिक त्रस्त झाले आहेत. हे भारनियमन बंद करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Civil strife caused by weightlifting | भारनियमनामुळे नागरिक त्रस्त

भारनियमनामुळे नागरिक त्रस्त

googlenewsNext

वडगाव मावळ : येथे दुपारी दोन तास होणाऱ्या भारनियमनामुळे अधिकारी व नागरिक त्रस्त झाले आहेत. हे भारनियमन बंद करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
येथे तहसीलदार, भूमी- अभिलेख, वनक्षेत्र, कोषागार, पंचायत समिती, दुय्यम निबंधक व सहायक निबंधक यांची कार्यालयं, बॅँका, शाळा व महाविद्यालय आहेत.
त्यात १२ वीचा निकाल लागल्याने विद्यार्थी शासकीय दाखले मिळविण्यासाठी कार्यालयात गर्दी करत आहे. त्यात भारनियमन व विजेच्या लपंडावामुळे शासकीय कार्यालयात विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे काम वेळेत पूर्ण होत नाही. येथे २४ तास वीजपुरवठा करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अतुल वायकर, ग्रामपंचायत सदस्य अंकुश काकरे, शैलेश वहिले, प्रतीक पिंजण, नवनाथ शिंदे, वैभव नवघणे, विकास सातकर, तुषार वहिले, गणेश वायकर व नागरिकांनी केली आहे.(वार्ताहर)

Web Title: Civil strife caused by weightlifting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.