योग्य वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू;  नातेवाईकांची पोलिसांत तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 05:46 PM2019-12-25T17:46:38+5:302019-12-25T17:48:19+5:30

गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे संतप्त नातेवाईकांनी सांगितले...

Civilian death due to lack of proper treatment and surgery; Relatives going to to police | योग्य वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू;  नातेवाईकांची पोलिसांत तक्रार 

योग्य वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू;  नातेवाईकांची पोलिसांत तक्रार 

Next

पुणे : विमानतळ परिसरातील एका खासगी रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकाला योग्य उपचार आणि शस्रक्रिया न केल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना बुधवारी घडली. शंकर लोकन्ना राठोड (वय 55 रा.रामनगर येरवडा) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. योग्य उपचार व शस्रक्रिया न करण्यात आल्यामुळे हा मृत्यू झाला असल्याचा आरोप मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी केलं आहे. त्यामुळे विमाननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्ह्या माहितीनुसार, घटनेत आवश्यक उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी मृत रूग्णाच्या नातेवाईकांनी कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.जेष्ठ नागरिक रूग्णाच्या मृत्यूस जबाबदार रूग्णालय प्रशासनावर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे संतप्त नातेवाईकांनी सांगितले. या प्रकरणी संबंधित  रूग्णालया कडून प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. या घटनेमुळे रूग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.

Web Title: Civilian death due to lack of proper treatment and surgery; Relatives going to to police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.