राजकीय हेतूने गुन्हा दाखल केल्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:38 AM2020-12-17T04:38:04+5:302020-12-17T04:38:04+5:30

पुणे : आपल्याविरुद्ध राजकीय हेतूने गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा दावा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. ज्येष्ठ ...

Claim to have filed a crime for political motives | राजकीय हेतूने गुन्हा दाखल केल्याचा दावा

राजकीय हेतूने गुन्हा दाखल केल्याचा दावा

Next

पुणे : आपल्याविरुद्ध राजकीय हेतूने गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा दावा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.

ज्येष्ठ दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी हर्षवर्धन जाधव यांना अटक करुन आज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.

हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले की, आपण बावधन येथे दुकानात गेलो असताना माझे आणि सहकारी महिलेचे अपहरण करुन मारहाण करण्यात आली. त्याविरोधात आपण पोलिसांकडे तक्रार द्यायला गेला असताना आपली तक्रार घेण्यात आली नाही. राजकीय हेतूने आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

जाधव यांचे वकील जहीर पठाण यांनी सांगितले की, हर्षवर्धन जाधव सहकारी महिलेसह औंध येथून मोटारीने जात असताना दुचाकी आडवी आणण्यात आली. अमन चड्डा, करण चड्डा, काँग्रेसचे नगरसेवक मनिष आनंद यांनी जाधव आणि त्यांची सहकारी महिलेला दुसर्‍या गाडीत बसविले. या मोटारीत सहकारी महिलेचा विनयभंग केला. तसेच जाधव यांना मारहाण केली. यानंतर जाधव हे पोलिस ठाण्यात गेले असता त्यांची तक्रार दाखल करुन घेण्यात आली नाही. राजकीय दडपणेे आणून जाधव यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात हर्षवर्धन जाधव यांचे सासरे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा हात आहे.

खडकीतील स्थानिक कॉंग्रेस नगरसेवक मनिष आनंद यांनी सांगितले की ममता चड्डा ही आपली बहिण असून तिला मारहाण झाल्याचे समजल्यावर आपण वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे विचारणा केली. त्यांनी जाधव हे औंध चौकीत असल्याचे सांगितल्यानंतर आपण तेथे गेलो. त्याअगोदर आपण जाधव यांना कधी पाहिलेही नाही. रावसाहेब दानवे यांच्याशी आपला काहीही संबंध नाही.

Web Title: Claim to have filed a crime for political motives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.