मोदींनी फक्त गुजरात ला मदत केली हा दावा खोटा : चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 01:16 PM2021-05-21T13:16:08+5:302021-05-21T13:17:15+5:30

उद्धव ठाकरेंना जमिनीवर राहण्यासाठी शुभेच्छा देत लगावला टोला

The claim that Modi only helped Gujarat is false | मोदींनी फक्त गुजरात ला मदत केली हा दावा खोटा : चंद्रकांत पाटील

मोदींनी फक्त गुजरात ला मदत केली हा दावा खोटा : चंद्रकांत पाटील

googlenewsNext

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त गुजरात ला मदत केली हा दावा खोटा आहे असं भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हणलं आहे. इतकंच नाही तर मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार होते असंही ते म्हणाले. या बरोबरच उद्धव ठाकरेंना जमिनीवर राहण्यासाठी शुभेच्छा असही पाटिल म्हणाले.

पुण्यामध्ये आज मुकुल माधव फाऊंडेशन आणि क्रिएटिव्ह फाऊंडेशन चा वतीने लोककलावंताना मदत देण्यात आली. त्यावेळी पाटिल माध्यमांशी बोलत होते. 

उद्धव ठाकरे यांचा कोकण दौऱ्या बाबत बोलताना पाटिल म्हणाले "देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी जमिनीवरून प्रवास केला. त्यांचा प्रवास हवेतून नाही तर जमिनीवरून होता.फडणवीस यांचा दौरा दोन दिवसांत पूर्ण पण होत आला आहे. उद्धव ठाकरे कधी नव्हे ते बाहेर पडले.त्यांचे पाय जमिनीवर राहावेत यासाठी शुभेच्छा." 

 

दरम्यान मोदींनी फक्त गुजरातचा दौरा करून गुजरात लाच मदत केली हा दावा खोटा असल्याचं पाटिल म्हणाले ."पंतप्रधानांचा बाबतीत रिस्क कमी घेता येते. त्यामुळे हवाई आढावा घेणं योग्य असल्याचं त्यांचं सुरक्षा यंत्रणेने सांगितले. इंदिरा गांधी पण असाच प्रवास केला होता . मोदींचा महाराष्ट्र दौरा ठरला होता. पण हवामान पाहता त्यांना सल्ला दिला गेला की जाणे योग्य नाही म्हणून त्यांनी दौरा रद्द केला. त्यांनी फक्त गुजरात ला मदत केली हा दावा खोटा. त्यांनी प्रत्येक मृताला मदत जाहीर केली आहे. त्यात महाराष्ट्रातले पण लोक येतात."

 

Web Title: The claim that Modi only helped Gujarat is false

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.