राज्य शासनाने महापालिकेला आर्थिक मदत केल्याचा दावा तथ्यहीन : मुळीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:11 AM2021-05-22T04:11:08+5:302021-05-22T04:11:08+5:30

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप तथ्य नसलेली माहिती देऊन पुणेकरांची दिशाभूल करीत असल्याची टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश ...

The claim that the state government has provided financial assistance to NMC is unfounded: Basic | राज्य शासनाने महापालिकेला आर्थिक मदत केल्याचा दावा तथ्यहीन : मुळीक

राज्य शासनाने महापालिकेला आर्थिक मदत केल्याचा दावा तथ्यहीन : मुळीक

Next

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप तथ्य नसलेली माहिती देऊन पुणेकरांची दिशाभूल करीत असल्याची टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

मुळीक म्हणाले, शहर भाजपच्या वतीने कोरोनाच्या आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाने पुणे महापालिकेला आर्थिक मदत करावी, अशी मागणी गेल्या दीड वर्षांपासून करण्यात येत आहे़ मात्र राज्य शासन मदत करायला तयार नाही. या संदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षांनी राज्य सरकारने पुण्याला १४० कोटी रुपयांची मदत केल्याचा दावा केला. परंतु त्यांच्या दाव्यात तथ्य नाही. ससून रूग्णालय, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे कॅन्टोन्मेंट, खडकी कॅन्टोन्मेंट, बारामती शासकीय महाविद्यालय, येरवड्यातील प्रादेशिक मनोरुग्णालय या शासकीय आस्थापनांना राज्य सरकारने मदत केल्याची यादी त्यांनी सादर केली आहे. याचा अर्थ पुणे महापालिकेला राज्य सरकारने मदत केला असा होत नाही. जगताप हे कोणताही अभ्यास न करता अर्धवट माहितीवर विधाने करून जगताप पुणेकरांची दिशाभूल करीत असल्याचेही ते म्हणाले़

Web Title: The claim that the state government has provided financial assistance to NMC is unfounded: Basic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.