पुणे कौटुंबिक न्यायालयातील मुलांच्या ताबा प्रकरणातील दाव्यांची सुनावणी पुन्हा लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 01:46 PM2020-04-04T13:46:52+5:302020-04-04T13:49:04+5:30

दाखल करण्यात आलेल्या दाव्यावरील सुनावणी यापूर्वी चार एप्रिलपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले होते.

Claims about of daughter hearing will be start from14 april in the Pune Family Court | पुणे कौटुंबिक न्यायालयातील मुलांच्या ताबा प्रकरणातील दाव्यांची सुनावणी पुन्हा लांबणीवर

पुणे कौटुंबिक न्यायालयातील मुलांच्या ताबा प्रकरणातील दाव्यांची सुनावणी पुन्हा लांबणीवर

googlenewsNext
ठळक मुद्देदाव्यावरील सुनावणी १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन संपल्यानंतरच सुरु होणार

पुणे : कौटुंबिक न्यायालयात मुलांच्या ताबा मिळावा म्हणून दाखल करण्यात आलेल्या दाव्यावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी चार एप्रिल पासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले होते. पुन्हा लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आल्यानंतर आता या दाव्यावरील सुनावणी १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन संपल्यानंतरच सुरु होणार आहे. मात्र दरम्यानच्या काळात काही तातडीच्या सुनावणी असतील तर त्या फॅमिली कोर्टामध्ये दाखल करता येणार आहेत. सध्या फॅमिली कोर्टात सध्या एक न्यायाधीश आणि मोजका न्यायालयीन कर्मचारी वर्ग तातडीच्या सुनावणीसाठी कार्यरत आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून, देशात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे न्यायालयीन कामकाजही ठप्प आहे. तातडीच्या दाव्यांच्या सुनावणीसाठी न्यायालयात न्यायाधीश आणि न्यायालयीन कर्मचारी वर्ग उपस्थित आहे. कोर्टामध्ये दाखल असलेल्या अनेक दाव्यांमध्ये पक्षकारांचे नुकसान होऊ नये म्हणून एक महिना पुढील तारखा कोर्टाकडून देण्यात आलेल्या आहेत. तारख्यांच्या सुनावणीसाठी पक्षकार उपस्थित राहू शकला नाही तर त्याच्या अनुपस्थितीत त्याच्या केसवर परिणाम होऊ नये म्हणून एकतर्फा आदेश देण्यात येऊ नये, असा सूचना हायकोर्टाकडून संबंधितांना लॉकडाऊन काळात देण्यात आलेल्या आहेत.लॉकडाऊनमुळे न्यायालयीन कामकाजाच्या वेळा कमी करण्यात आलेल्या आहेत. सकाळी अकरा ते दोन यावेळेत कोटार्चे कामकाज सध्या सुरु असते. फॅमिली कोर्टात तातडीचा दावा दाखल करायचा असेल एक न्यायाधीश उपलब्ध आहेत. लहान मुलांच्या ताब्याच्या सुनावणी आता लॉकडाऊननंतर होणार आहेत. फॅमिली कोर्टात दाखल होणा?्या मुलांच्या ताब्याच्या सुनावणी यापर्ू्वी चार एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

Web Title: Claims about of daughter hearing will be start from14 april in the Pune Family Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.