सेट परीक्षेचे शुल्क वाढवल्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:12 AM2021-05-21T04:12:30+5:302021-05-21T04:12:30+5:30

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी सेट परीक्षेचे केले जाते. विद्यापीठ प्रशासनाकडून या ...

Claims to increase set test fees | सेट परीक्षेचे शुल्क वाढवल्याचा दावा

सेट परीक्षेचे शुल्क वाढवल्याचा दावा

Next

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी सेट परीक्षेचे केले जाते. विद्यापीठ प्रशासनाकडून या परीक्षेसाठी कुठलीही आर्थिक मदत केली जात नाही. विद्यार्थ्यांच्या शुल्कातून प्राप्त होणाऱ्या रकमेतून परीक्षेचा सर्व खर्च भागवावा लागतो. २०१९ पूर्वी तब्बल पंधरा वर्षे या शुल्कात कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. २०१९ पासून वाढीव शुल्कानुसार परीक्षा घेतली जात आहे. परंतु, विद्यापीठाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुल्कवाढ केली असल्याचे काही विद्यार्थी संघटनाचे यांचे म्हणणे आहे. विद्यापीठाने तीन वर्षांपूर्वी शुल्क वाढीचा निर्णय घेतला असला तरी अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी जुन्याच शुल्कानुसार परीक्षा घेणे शक्य असल्यास त्याबाबत विद्यापीठाने त्याचा विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Claims to increase set test fees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.