व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉल करून दावा निकाली; लोकअदालतीतील प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 04:01 AM2018-12-09T04:01:35+5:302018-12-09T04:01:51+5:30

वडिलोपार्जित जमिनीत हिस्सा मिळावा, म्हणून दिवाणी न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात प्रथमच व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉल करून कबुलीजबाब घेत लोकअदालतीमध्ये दावा निकाली काढल्यात आला.

Claims made by whotswap video call; Epic episode | व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉल करून दावा निकाली; लोकअदालतीतील प्रकरण

व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉल करून दावा निकाली; लोकअदालतीतील प्रकरण

googlenewsNext

पुणे : वडिलोपार्जित जमिनीत हिस्सा मिळावा, म्हणून दिवाणी न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात प्रथमच व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉल करून कबुलीजबाब घेत लोकअदालतीमध्ये दावा निकाली काढल्यात आला. व्हिडीओ कॉलद्वारे अर्जदारांना विरोधी पक्षाने ३६ लाख रुपये देण्याचे मान्य करत तडजोडीअंती हा दावा निकाली काढला.

वाल्हे गावात असलेल्या सुमारे ६० हेक्टरच्या वडिलोपार्जित जमिनीत पत्नीला हिस्सा मिळावा, म्हणून मेहुणा व त्यांच्या मुलीने व तीन मामा, आजी, मावशी आणि ज्यांना जमीन विकण्यात आली त्यांच्याविरोधात दावा दाखल केला होता. दोन्ही बाजूंनी तडजोडीची तयारी दर्शविली होती. त्यानुसार विरुद्ध पक्षाने अर्जदारांना ३६ लाख रुपये देण्याचे मान्य केले होते. तक्रारदारांपैकी एक अर्जदार हजर नसल्याने प्रतिवाद्यांचे वकील अ‍ॅड. सुभाष पवार आणि अ‍ॅड. नितीन झंजाड यांनी अर्जदाराला व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हिडीओ कॉल केला. न्यायाधीश बधाणे यांच्या पॅनलने अर्जदाराला तडजोडीला तयार आहे का, अशी विचारणा केली. त्याने संमती दर्शविल्यानंतर हा दावा निकाली काढण्यात आला. तक्रारदारांच्यावतीने अ‍ॅड. अफताब खान यांनी कामकाज पाहिले.

लोकअदालतीत प्रथमच अशा प्रकारे विशेष दिवाणी दावा व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉलिंगचा वापर करून निकाली काढण्यात आला. संबंधित व्यक्ती दिल्ली येथे असल्याने लोकअदालतीला उपस्थित राहू शकली नाही. मात्र, या सुविधेमुळे त्यांचा दावा निकाली काढता आला. त्याने दिल्लीला जाण्यापूर्वी तडजोडपत्रावर स्वाक्षरी केली होती, अशी माहिती अ‍ॅड. नितीन झंजाड यांनी दिली.

चेक न वटल्याप्रकरणी ८ कोटी ४७ लाखांवर तडजोड
व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी दिलेले चेक न वटल्याप्रकरणी दाखल गुन्हा ८ कोटी ४७ लाख ३९ हजार रुपयांवर तडजोड करून निकाली काढण्यात आला. चैतन्य सेंटर फॉर सायकॉलॉजिक हेल्पने व्यवसायाच्या वाढीसाठी एचडीएफसी बँकेकडून २०१५ मध्ये ७ कोटी ३६ लाख ९३ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.
संबंधित कर्जाची परतफेड करण्याकरिता दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी बँकेकडून न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता. लोकअदालतीमध्ये याबाबत तडजोड होऊन मुद्दल आणि व्याजासह ग्राहकाने आठ कोटी ४७ लाख ३९ हजार रुपये बँकेला देण्याचे निश्चित करण्यात येऊन दावा निकाली काढण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या रकमेचा दावा प्रथमच लोकअदालतीत निकाली काढण्यात आला.
लोकअदालतीत एचडीएफसी बँकेच्यावतीने रोहन एडके, तर फर्मच्यावतीने भागीदार रोनी जॉर्ज व सुशपती जॉर्ज उपस्थित राहिले. अ‍ॅड. एम. एस. हरताळकर यांनी बँकेच्यावतीने बाजू मांडली, तर बचाव पक्षाच्यावतीने विधी सेवा प्राधिकरणाचे अनिल तांबे व मिलिंद सोवनी यांनी काम पाहिले.

अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना मिळणार ४२ लाख
अपघाती मृत्यू झालेल्या ट्रान्स्पोर्ट व्यवसायातील ठेकेदाराच्या कुटुंबीयांना ४२ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा निकाल लोकन्यायालयात लागला. विशेष न्यायाधीश एस. के. कºहाळे यांच्या न्यायालयाने हा खटला निकाली लावला.
सीताराम निमसे (मूळ रा. आळेफाटा) १६ जून २०१२ रोजी मित्राच्या कारमधून चाक णवरून नारायणगावला निघाले होते. त्यांची गाडी कळम येथे आली असता नाशिकच्या बाजूने येणाऱ्या कारने निमसे यांच्या गाडीला धडक दिली. या अपघातात यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने ६० लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळावी, असा दावा निमसे यांच्या कुटुंबीयांनी अ‍ॅड. अनिरुद्ध पायगुडे आणि अ‍ॅड. नितीन कहाणे यांच्यामार्फेत धडक देणाºया कारचा मालक आणि बजाज अलायन्स विमा कंपनीविरोधात केला होता. तडजोडीअंती ४२ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा निर्णय झाला.

Web Title: Claims made by whotswap video call; Epic episode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.