लाच घेताना क्लार्कला पकडले

By Admin | Published: April 26, 2017 03:59 AM2017-04-26T03:59:06+5:302017-04-26T03:59:06+5:30

निवडणूक काळात घेतलेल्या गाड्यांचे बिल देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच घेताना निवडणूक शाखेतील ज्युनिअर क्लार्कला

Clark caught the bribe | लाच घेताना क्लार्कला पकडले

लाच घेताना क्लार्कला पकडले

googlenewsNext

पुणे : निवडणूक काळात घेतलेल्या गाड्यांचे बिल देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच घेताना निवडणूक शाखेतील ज्युनिअर क्लार्कला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले़ संतोष पंडित घोडके (वय ३८, रा. सीता नामदेव भवन, गुरुवार पेठ) असे या ज्युनिअर क्लार्कचे नाव आहे़ तक्रारदार यांचा टुरिस्ट गाड्यांचा व्यवसाय आहे़ त्यांची एक गाडी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरिता अधिग्रहण केली होती़ या गाडीचे बिल २१ हजार ६०० रुपयांचा धनादेश द्यायचा होता़ हा धनादेश देण्यासाठी घोडके याने त्यांच्याकडे २ हजार ४०० रुपयांची लाच मागितली़ तडजोडीनंतर २ हजार रुपये देण्याचे ठरले़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हवेली तहसीलदार कार्यालयात घोडकेला लाच घेताना पकडले़ (प्रतिनिधी)

Web Title: Clark caught the bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.