येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी; सोडविण्यास गेलेल्या हवालदारालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 04:13 PM2022-11-09T16:13:27+5:302022-11-09T16:13:39+5:30

खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी च्या खूनांमध्ये येरवडा कारागृहात असलेल्या कैद्यांमध्ये जोरदार हाणामारी

Clash among inmates at Yerawada Jail; The constable who went to rescue was also beaten with kicks | येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी; सोडविण्यास गेलेल्या हवालदारालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण

येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी; सोडविण्यास गेलेल्या हवालदारालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण

googlenewsNext

पुणे : खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी च्या खूनांमध्ये येरवडा कारागृहात असलेल्या कैद्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. ही भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या कारागृह हवालदाराला या कैद्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

याबाबत पोलीस हवालदार हनुमंत मोरे (वय ५८) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार येरवडा कारागृहातील हॉस्पिटल यार्डमधील बॅरेक बाहेर सोमवारी सकाळी ८ वाजता घडला. त्यानुसार समीर शकील शेख, तंरग राकेश परदेशी, निलेश श्रीकांत गायकवाड, पुरुषोत्तम राजेंद्र वीर, देवा नानासो जाधव अशी गुन्हा दाखल केलेल्या न्यायालयीन कैद्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम वीर व त्याच्या साथीदारांनी मांजरी परिसरात दरोडा टाकला होता. त्यांचा दरोडा व इतर गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. तरंग परदेशी हा नवी खडकी येथील गुंड असून त्याच्यावर तरुणावर तलवारीने वार करुन खूनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनविण्यात आली आहे. हे सर्व पाचही जण वेगवेगळ्या टोळ्यांमधील असून त्यांच्यात सोमवारी सकाळी ८ वाजता भांडणे झाली. तेव्हा समीर शेख, तरंग परदेशी, निलेश गायकवाड हे बंद खोलीतील कैद्यांच्या दिशेने फरशी व दगडाचे तुकडे फेकून मारत होते. तेव्हा फिर्यादी व त्यांचे सहकारी तेथे कर्तव्य बजावत होते. फिर्यादी यांनी या तिघांना दगडफेक करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी फिर्यादी यांना हाताने पायाने मारहाण केली. पुरुषोत्तम वीर व देवा जाधव यांनी त्यांना मारहाण करण्यास प्रोत्साहन दिल्याने त्यांच्यावरही सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे तपास करीत आहेत.

Web Title: Clash among inmates at Yerawada Jail; The constable who went to rescue was also beaten with kicks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.