लोणावळ्यात गवळीवाडा श्रीकृष्ण डेअरीसमोर हाणामारी; आठ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 01:02 PM2023-01-02T13:02:30+5:302023-01-02T13:05:01+5:30
लोणावळा शहर पोलिस स्टेशनमध्ये आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल...
लोणावळा (पुणे) :लोणावळा शहरातील गवळीवाडा नाका येथील श्रीकृष्ण डेअरीसमोर ३१ डिसेंबरच्या रात्री साडेनऊच्या सुमारास किरकोळ कारणावरून पर्यटकांनी स्थानिक युवकांना शिवीगाळ व मारहाण केली. याप्रकरणी लोणावळा शहर पोलिस स्टेशनमध्ये आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आतिश किसन गुप्ता (वय ३३, रा. गवळीवाडा, लोणावळा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिलशाह हुसेन अहमद खान (वय २६, रा. जय संतोषी मातानगर, घाटकोपर वेस्ट), फजलशहा फरियादअली शहा (वय २१, रा. साकीनाका, मुंबई), इम्रान महंमद इब्राहिम शेख (वय १९, रा. घाटकोपर मुंबई), मैफुस आलम कमालुद्दीन खान (वय २६, रा. घाटकोपर मुंबई), खालीद इस्माईल शेख (वय २२, रा. घाटकोपर वेस्ट), तुषार तात्याराव वाव्हाळे (वय २१, रा. साकीविहार रोड, मुंबई), दिव्या कैलास यशवंते (वय २०, रा. घाटकोपर मुंबई) व इतर अज्ञात इसम याच्यावर सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील सर्वजण लोणावळ्यात फिरायला आले असताना त्यांनी किरकोळ कारणावरून फिर्यादी आतिश गुप्ता, धनंजय गवळी व प्रणय गवळी यांना दमदाटी करून हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. वरील सर्वांना लोणावळा शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत लोणावळा शहरचे पोलिस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदेश बावकर पुढील तपास करत आहेत.